भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी मारावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अर्चना यादव, आकाश अवतारे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते