संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कोणी चौथी पास तर कोणी दहावी ,बारावी पास एवढेच काय तर पदव्युत्तर पदवी प्राप्त बेरोजगारही कोतवाल भरतीच्या रांगेत असल्याचे चित्र आहे.बेरोजगार राहण्यापेक्षा गावातील कोतवालकी बरी म्हणत कोतवालकीच्या सात रिक्त जागासाठी तब्बल 85 उमेदवारांनी अर्ज केले त्यामुळे कोतवाल पदासाठी स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कामठी तालुक्यात कोतवालाची 7 पदे रिक्त आहेत.प्रसिद्ध जाहीरनामा नुसार आलेल्या ऑफलाईन अर्जात शैक्षणिक पात्रता इयत्ता चौथा वर्ग पास ठेवण्यात आला होता मात्र यासाठी पदवी, पदव्युत्तर उमेदवारांनी सुद्धा अर्ज केले आहेत. त्यामुळे कोतवाल पदभरतीत चांगलीच स्पर्धा होण्याची शक्यता आहे.कामठी तालुक्यातील कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती 2023 नुसार कामठी तालुक्यातील सात साझ्यात सात कोतवाल पद रिक्त आहेत .याबाबत जाहीरनाम्यात दर्शविल्या नुसार येरखेडा गावातील साझा क्र 16 येथे 1 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आखीव कोतवाल पदासाठी रिक्त असून भिलगाव साझा क्र 15 मध्ये भिलगाव व खसाळा या दोन गावाचा समावेश होत येथील अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव रिक्त कोतवाल पदासाठी 1 जागा, साझा क्र 26 अ, केसोरी मध्ये केसोरी ,भामेवाडा,आसलवाडा, व जाखेगाव या चार गावाचा समावेश होत असून भटक्या जमाती (,क)प्रवर्गासाठी राखीव रिक्त 1 जागा,साझा क्र 32 आडका मध्ये आडका,टेमसना, कुसुम्बी, परसोडी या चार गावाचा समावेश होत असून भटक्या जमाती (ड)प्रवर्गासाठी राखीव कोतवाल पदाची 1 जागा रिक्त आहे,साझा क्र 28 भुगाव मध्ये भुगाव व मांगली या दोन जागा चा समावेश होत असून आर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी आरक्षित 1 जागा रिक्त आहे. साझा क्र 19 मध्ये आजनित आजनी व गादा या दोन गावाचा समावेश होत असून खुला प्रवर्गासाठी आरक्षित कोतवाल पदाची एक जागा रिक्त आहे.साझा क्र 20 महालगाव येथे महालगाव व कढोली या दोन गावाचा समावेश होत असून खुला प्रवर्ग(महिला)साठी कोतवाल पदाची 1 जागा रिक्त आहे.अश्या प्रकारे या सात रिक्त कोतवाल पदासाठी एकूण 85 अर्ज आले असून या 85 उमेदवारांची 23 जुलै ला लेखी परीक्षा होणार आहे.