10 सप्टेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई :- कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत मंगळवार दि. 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे.

सदर पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शन धारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून पेन्शन विषयी आपले प्रश्न उपस्थित करावे. असे महेंद्र बेलदार,तहसिलदार,(सामान्य प्रशासन) कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठीत करणार

Thu Sep 5 , 2024
– नागपुरात 100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय – सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले चित्रसृष्टीसाठी धाडसी निर्णय मुंबई :- चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com