कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक – २०२४ – कोंकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान

– १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी मुंबई :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४ रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण 1 लाख 20 हजार ७७१ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी 41 हजार 44 पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण 67 हजार ६४६ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दिनांक 26 जून जानेवारी 2024 मतदान वेळ :- सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ ६४.१४%

ठाणे- ५८.४२%, पालघर- ६३.२३%, रायगड- ६७.५९%, रत्नागिरी-६९.१४%, सिंधुदूर्ग-७९.८४% एकूण- ६४.१४%

मुंबई पदवीधर मतदारसंघ ५६.०१%

मुंबइ शहर- ५७.६८%, मुंबई उपनगर-५५.४४% एकूण-५६.०१%

मुंबई शिक्षक मतदारसंघ ७५.७७%

मुंबइ शहर- ८०.१२%, मुंबई उपनगर-७४.९५% एकूण-७५.७७%

मत मोजणी सोमवार दि. 1 जुलै 2024 रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-24, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावत्र मुलीला मारहाण करणाऱ्या आई वडीला विरोधात गुन्हा दाखल

Thu Jun 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एक 12 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना 21 जून ला घडली होती मात्र याबाबत त्या मुलीच्या आई वडिलांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कुठलीही तक्रार नोंदविली नव्हती.मात्र ही अल्पवयीन मुलगी 25 जून ला रेल्वे स्टेशन बडनेरा येथे आढळून आली यावेळी मुलीने सांगितलेल्या पत्त्यावरून तिला जुनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com