संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर येथे कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या पत्नी सह मेहुण्यांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गतरात्री साडे नऊ दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित जख्मि पत्नीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख जाफर शेख वय 41 वर्षे रा कामगार नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 307,504,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सूरु आहे.