आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकुने हल्ला, परिसरात खळबळ

दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, एका आरोपिला अटक, एक फरार.  

कन्हान : – शहरात असामाजिक तत्वाचा दिवसेदिवस बोलबाला वाढुन आरोपी पकडण्याकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोन आरोपींनी चाकुने हल्ला करून पोलीसाला जख्मी केल्याची धक्कादायक घटना कन्हान शहरातील आंबेडकर चौकात घडल्याने परिसरात एकच खळखळ उडत भीतीचे वातावरण निर्माण होत पोस्टे कन्हान अंतर्गत शांती सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या कार्यप्रणाली प्रश्न निर्माण झाला आहे.

गुरुवार (दि.१७) नोव्हेंबर ला सायंकाळी ७.३० ते ७.४० वाजता दरम्यान कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या आदेशानुसार पो.अ वैभव ज्ञानेश्वर बोरपल्ले वय ३० वर्ष रा.गणेश नगर कन्हान हे आपल्या स्टाॅप सह अप क्र ६०६/२२ गुन्हयातील आरोपी पकडण्यासाठी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि सदर गुन्ह यातील आरोपी १) गौरव उर्फ तेनाली राजु राऊत राह. अशोक नगर कन्हान २) प्रशांत सार्वे राह. कन्हान हे आंबेडकर चौक येथे अवैधरित्या कोणाला मारण्याच्या उद्देशाने चाकु घेऊन फिरत आहे. अश्या विश्वसनीय माहिती वरून पो.अ वैभव बोरपल्ले, पो. शि सम्राट वनपर्ती पोलीस कर्मचारी आरोपी पकडण्या करिता घटनास्थळी पोहचले असता आरोपी १) गौरव उर्फ तेनाली राजु राऊत २) प्रशांत सार्वे असे दोन आरोपी मिळुन आले. पो अ वैभव बोरपल्ले व पो शि सम्राट वनपर्ती यांनी आरोपी तेनाली उर्फ गौरव राऊत यास पकडले असता त्याचा साथीदार आरोपी प्रशांत सार्वे यांने तेनाली यास पोलीस अमलदार यांचा ताब्यातुन हिसकावण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथ ळा आणला व तेनाली यास ” अबे सामान निकाल मार सालेको ” असे म्हटल्याने आरोपी तेनाली याने त्याचा खिश्यातुन चाकु काढुन पो अ वैभव बोरपल्ले याचा पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वैभव बोरपल्ले यांनी तो अडविताना त्याच्या डाव्या हाताच्या पंज्याचा करंगळीच्या मागील बाजुस लागुन जख्मी झाले. हे पाहुन तेनाली याने तो चाकु आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर मारल्याने त्याचा डावा हात आतील बाजुने कापला गेला. सदर घटनेनंतर कन्हान पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून जख्मी पो अ वैभव बोरपल्ले व आरोपी तेनाली यांना सरकारी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे उपचाराकरीता नेऊन उपचार केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी पो अ वैभव बोरपल्ले व आरोपी तेनाली याना पुढील उपचारकरीता मेयो हॉस्पीटल नागपुर रेफर केल्याने गार्ड ड्युटी करिता पोलीस अमलदार नेमुन त्यांचा ताब्यात तेनाली यास देऊन सरकारी वाहनाने पुढिल उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल नागपुर येथे पाठविण्यात आले. आरोपी तेनाली उर्फ गौरव राऊत याने पोलीस अमलदार वैभव बोरपल्ले यांना जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न करित आरोपी तेनाली व त्याचा साथीदार प्रशांत यांनी सरकारी काम काजात अडथळा निर्माण केल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी वैभव बोरपल्ले यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला आरोपी १) गौरव उर्फ तेनाली राजु राऊत २ ) प्रशांत सार्वे यांचा विरुद्ध अप क्र ६७१ /२०२२ कलम ३५३, ३०७, ३४ भादंवि सहकलम ४, २५, २७ भा.ह.का १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत एका आरोपीचा शोध घेत आहे .

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रक्षकच भक्षकां ची भुमिका बजावित असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. कन्हान शहरात पोलीसावर जिवे मारण्याच्या हमल्याची दुसरी घटना असुन पोलीस मुंग गिळुन मुक दर्शक असल्याने शेवटी असामाजिक तत्व पोलीसावर सुध्दा हमला करण्यास मागे पुढे पाहत नसल्याने कन्हान पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासन आहे किवा नाही. असा प्रश्न उपस्थित होत असुन सुध्दा वरिष्ठ पोलीस अधिकारी सुध्दा कार्यवाही न करण्याचे कारण समजण्याच्या आड आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"अस्थायी आरोग्य कर्मचारियों" एवं "आशा" कर्मियों ने बोनस की मांग को लेकर दिया धरना

Sat Nov 19 , 2022
नागपूर :-नागपुर महानगर पालिका क्षेत्र के अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, क्षयरोग उच्चाटन के अंतर्गत काम करने वाले अस्थायी आरोग्य कर्मचारियों एवं “आशा” कर्मियों को दिवाली का बोनस दिया जाए इस मांग को लेकर अभीतक निगम प्रशासन ने कोई निर्णय नाही लिया अतः आज शुक्रवार दिनांक 18 नवम्बर 2022 को संविधान चौक पर “बोनस का क्या हुआ हम तो पूछेंगे” इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com