कन्हान :- महाराष्ट्र सरकार, मत्स्यव्यवसाय विभाग, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) नागपुर यांच्या सौजन्याने आणि ढिवर समाज सेवा संघटना कन्हान व्दारे समाज बांधवाकरिता हनुमान मंदीर, इंदिरा नगर कन्हान येथे किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) शिबिर आणि एनएफडीपी नोंदणी कार्यशाळेत दोनशे ढिवर समाज बांधवानी शिबीराचा लाभ घेतला.
केन्द्र आणि राज्य सरकारकडुन मच्छिमारांचे जिवनमान उंचविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या सर्व योजना मासेमारां पर्यंत पोहचविण्याकरिता तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन, मासेमारांना अर्थसाहाय्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने ” नॅशनल फिशरिज डिजीटल प्लॅटफाॅर्म (एनएफडीपी) ” वर नोंदणी करणे, मच्छिमार, मत्स्य व्यवसायिक, मत्स्यसंवर्धक, प्रधानमं त्री मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी तसेच मच्छिमार सहकारी संस्था, ज्यांचा मासेमारीशी प्रत्यक्षात/अप्रत्य क्षात संपर्क येतो अशी व्यक्ति या नोंदणी प्रकियेत सहभागी होऊन एनएफडीपी नोंदणी प्रमाणप्रत्र प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकार, मत्स्यव्यवसाय विभाग, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) नागपुर च्या सौजन्याने आणि ढिवर समाज सेवा संघटना कन्हान व्दारे हनुमान मंदिर, इंदिरानगर पाणी टाकी जवळ कन्हान येथे किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) शिबिर आणि एनएफडीपी नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीर व कार्यशाळेत मत्स्य व्यवसाय विभाग, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) नागपुर येथील वरिष्ट लिपीक मा. सतिश उरकुडे सह डाटा इंट्री ऑफरेटर गौरव लांजेवार आणि अमोल बोरीवार हयानी उत्तम रित्या लोकांचे समाधान करित दोनशे ढिवर समाज बांधवाची नोंदणी केली. मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी यांनी प्रत्येक वेळेस मदतीचे आश्वासन, मासेमार बांधवांना दिले. उपस्थित समाज बांधवांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आयोजन समिती द्वारा घेण्यात आली होती.
परिसरातील अनेक समाजबांधव आले असुन मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी तालुक्यातील समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित झाले होते. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) शिबिर आणि एनएफडीपी नोंदणी कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता ढिवर समाज संघटना कन्हान अध्यक्ष सुतेश मारबते, सचिव मनोज मेश्राम, सदस्य बालचंद्र बोंदरे, गितेश मोहन, श्रीकांत मानकर, तुळशीराम भोयर, मनोज बावणे, नरेश बावणे, नरेश मेश्राम, रेखा भोयर, कुंदा कांबळे, श्रुती मारबते, दिक्षा मारबते आदीसह समाज बांधवानी परिश्रम घेऊन सहकार्य केले.