दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेत कीर्तनाने शिक्षण सप्ताहाचा समारोप ! 

– जिल्हा परिषद शाळेचा आगळा वेगळा उपक्रम ! 

दापोरी :- मोर्शी पंचायत समितीमध्ये विशेष उल्लेखनीय उपक्रम राबवणारी आदर्श शाळा म्हणजे दापोरी जिल्हा परिषद शाळेचा उल्लेख केला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार जी प शाळा दापोरी येथे शिक्षण सप्ताह विविध प्रकारच्या कार्यक्रम ने साजरा करण्यात आला. पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी TLM अंतर्गत विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मुलांनी तयार केले, त्याची प्रदर्शन मांडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान बाबत जाणीव जागृती करण्यात आली. शाळेत डिस्कशन हॉल मध्ये ह्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ह्या मध्ये त्या त्या वर्गाचे शिक्षक सहभागी झाले होते. तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आला. देशी खेळ बाबत क्रीडा शिक्षक श्री नेताजी पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. चौथा दिवशी सर्वात आवडता विषय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वेशभूषा, नृत्य गायन, तबला वादन, कविता गायन घेण्यात आले.

पाचव्या दिवशी कौशल्य विकास शिबीर शाळेत घेण्यात आले, बँक व्यवहार, शॉप व्यवहार, ग्राहक दुकानदार व्यवहार संवाद कौशल्य असे विकसित करन्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. सहाव्या दिवशी क्षेत्र भेट, डिजिटल स्किल विकास, अनिमेशन, वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण सप्ताहाचा शेवट ह भ प नैतिक महाराज ह्या मुलाने सादर केलेल्या किर्तनाने करण्यात आली. वर्ग सहा वा मध्ये शिकणाऱ्या नैतिक ने सात दिवसाचा आढावा कीर्तनातून घेतला. एक मूल एक झाड, अंधश्रद्धा, कौशल्य विकास, स्वच्छता संदेश, व्यक्तिमत्त्व विकासाकरिता हा शिक्षण सप्ताह उपयोगी पडणार आहे. हा शिक्षण सप्ताह यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी, केंद्र प्रमुख सुरेंद्र वानखडे, शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेतील सर्व उपक्रम बघून मोर्शी प,स चे गट शिक्षणाधिकारी डॉ नितीन उंडे, शा पो आ अधीक्षक भवरे , गावाच्या सरपंच संगीता ठाकरे, उप सरपंच तायवाडे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यासह सर्व सदस्य यांनी शाळेचे कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 10 हजार 649 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

Tue Jul 30 , 2024
Ø तडजोड मुल्य 32 कोटी 47 लाख रुपये Ø लोकअदालतीने सावरला 21 जोडप्यांचा संसार Ø जुनी 145 हून अधिक प्रकरणे सामंजस्याने निकाली यवतमाळ :- राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अदालतीत 10 हजार 649 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मुल्य तब्बल 32 कोटी 47 लाख ईतके […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!