खोडगाव जि.प. शाळेत उपसरपंचांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

– पुस्तकांचे केले वितरण

रामटेक :- तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या तथा ग्रामपंचायत काचुरवाही अंतर्गत येत असलेल्या खोडगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये शाळेच्या पहील्या दिवसीच उपसरपंच शिशुपाल अतकरे यांनी विद्यर्थ्यांना पुष्प देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

खोडगाव जि.प. शाळेमध्ये १ ते ४ वर्ग आहे. येथे गावातील व परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान नवीन सत्राची सुरुवात होताच म्हणजेच दि. ३० जुन रोज शुक्रवार ला पहिल्या वर्गात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांची मोठी पटसंख्या पाहुन उपसरपंच शिशुपाल अतकरे यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांचाही शाळेप्रती उत्साह वाढला. तसेच वर्ग १ते ४ पर्यतच्या सर्व मुलांना जिल्हा परिषद शाळेतर्फे पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये शिशुपाल अतकरे उपसरपंच ग्रा.पं. काचुरवाही (खोडगाव) यांचेसह कोडवती , वरठी , पितांबर पानतावणे, भारत गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, लता बोबडे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन सहभागी होण्याची मुभा द्या - नागपूर (ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांची मागणी

Mon Jul 3 , 2023
नागपूर :- सध्या राज्यभरात अजित पवार व छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्या शपथविधीमुळे नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. यांच्या शपथविधीशी राष्ट्रवादीचा काहीच संबंध नसल्याचं शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राष्ट्रवादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com