खामगाव-जालाना चौपदरीकरणाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

  मुंबई : खामगाव- जालना येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातील तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संजय गायकवाड, कैलास गोरंट्याल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

          मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की,  खामगाव- जालना चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणच्या रस्त्यांवरील कामासाठी हरकती घेण्यात आल्याने ही कामे प्रलंबित आहेत. तर काही ठिकाणी वनक्षेत्रातील लांबीत काम करण्याकरिता वन विभागाकडून परवानगी प्राप्त होईपर्यंत विलंब होत असल्याने लवकरच वन विभागाबरोबर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. खामगाव- जालना चौपदरीकरणाचे काम तीन टप्प्यात होणार असून याकामात आतापर्यंत 300 हरकती आल्या असताना  299 हरकती मार्गी लावण्यात आल्या असून उर्वरित 1 हरकत सुध्दा निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

काटोल तहसील में बेमौसम बारिश ने बडायी किसानों की चिता।

Wed Dec 29 , 2021
काटोल – मौसम विभाग द्वारा जारी बेमौसम बारिश तथा ओलावृष्टि होने की संभावना बताई गई थी वहीं आज सुबह से ही आसमान में बादलों के मंडराने तथा सुबह दस बजे बादलों गर्जना बारिश की बौछारें हुयी दोपहर एक बजे कही कही जगहों पर रिमझिम बारिश और काटोल एमआयडीसी परिसर में तुरंत के दाने इतनी ओलावृष्टि छरे गिरे वहीं दोपहर तीन-चार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!