संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:- तालुक्यातील खैरी ग्रामपंचायतच्या ग्रामवासीयांनी खैरी परिसरातील कोराडी व खापरखेडा विद्युत प्रकल्प राख डंपिंगयार्ड परिसरात गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान दिले असून गंभीर जखमी मोराला वन विभागाच्या स्वाधीन केले प्राप्त माहितीनुसार वारेगाव –सुरदेवी मार्गावर कोराडी व खापरखेडा येथील विद्युत प्रकल्पाचे राखत डंपिंग यार्ड असून मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असल्यामुळे या परिसरात मोर ,लांडोर, हरीण, व इतर प्राणी , पक्ष्याचे कळप वास्तव्यास आहेत मोर लांडोर चे कळप परिसरात फिरत असताना अज्ञात इसमाने राष्ट्रीय पक्षी मोराला काठीने मारहाण केल्याने राष्ट्रीय पक्षी गंभीर जखमी झाला असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर राष्ट्रीय पक्षी मोराला ग्रामपंचायत कार्यालयात आणून त्याचेवर प्राथमिक उपचार करून नागपूर सेमिनरी हिल येथील वन विभागाला गंभीर मोर असल्याची माहिती दिली वन विभागाचे वनरक्षक एम वाय वनकर ,सहकारी रवी मिटकरी, बंडू मगर, स्वप्नील भुरे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन गंभीर जखमी राष्ट्रीय पक्षी मोराची पाहणी करून त्याला रुग्णवाहिका द्वारे त्वरित सेमनेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले गंभीर जखमी राष्ट्रीय पक्षी मोराला कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरी ग्रामपंचायतचे सरपंच मोरेसर कापसे यांनी तत्परतेने गंभीर राष्ट्रीय पक्षी मोरावर प्राथमिक उपचार करून वन विभागाचे स्वाधीन केल्या बद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे कौतुक केले आहेत.