संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 11:-खैरी ग्रामपंचायत प्रभाग क्र 2 च्या ग्रा प सदस्य प्रीती मानकर यांना शासकीय जागेवर अतिक्रमन करून बांधकाम केल्याप्रकरणी 14 मार्च 2022 ला अप्पर जिल्हाधिकारीनी अपात्र घोषित केले होते.या आदेशविरुद्ध महाराष्ट्र ग्रा प अधिनियम 1958 चे कलम 16(2) अंतर्गत अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या न्यायालयात सादर केलेल्या स्थगनादेश प्रकरणी अप्पर आयुक्तांनी 6 जून ला झालेल्या सुनावणीत मूळ अभिलेख येईपर्यंत व 28 जून ला होणाऱ्या सुनावणी पर्यंर अपात्र झालेल्या ग्रा प सदस्य प्रीती मानकर च्या अपात्रतेवर स्थगनादेश दीला आहे.
कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रामपंचायत सदस्य प्रीती मंगेश मानकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय जागेवर अतिक्रमन करून बांधकाम केल्याची तक्रार खैरी ग्रामवासी श्याम मारोतराव ठाकरे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेंल्या चौकशी अंती कोर्ट विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत जिल्हा परिषद नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी अधिकारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1),(ज-3)व 16 अनव्ये ग्रा प सदस्य प्रीती मंगेश मानकर यांना सदस्यपदावरून अपात्र घोषित केले होते मात्र या आदेशाच्या अपिलार्थ झालेल्या सुनावणीत आयुक्तांनी 28 जून पर्यंत स्थग्नादेश दिला आहे
खैरी ग्रा प सदस्य प्रीती मानकर च्या अपात्रतेवर स्थागनादेश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com