कत्तलीसाठी जनावरे विकणाऱ्या (Ravet) आणि त्यांची वाहतूक करणाऱ्या आरोपीतांवर केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 18) संध्याकाळी करण्यात आली.
नागपूर – केळवद ठाण्याच्या हद्दीतून जनावरे कोंबून कटाईकरिता नेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलीस स्टॉप नि मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरेवरुन मौजा उमरी ब्रीज (उमरी शिवार) येथे नाकाबंदी करीत असताना करड्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने पांढूर्णा (एम.पी) कडून नागपुर रोडने येतांना दिसला त्यास आम्ही पंचासमक्ष स्टॉप चे मदतीने लाल ट्रफिक लाईट ने थांबण्याचा ईशारा केला असता सदर वाहन चालक याने आपले ताब्यातील वाहन न थांबवता त्याचे ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी वळवून पांढूर्णा च्या दिशेने पळुन जात असता त्यास स्टॉप व पंचासह पाठलाग करून परत लाल ट्रफिक लाईट ने थांबण्याचा ईशारा करून सदर वाहन चालकाने आपले वाहन रोडच्या कडेला (सालई फाटा) येथे थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आजुबाजूला पंचा समक्ष शोध घेतला असता आरोपी मिळून आले नाही. पंचासमक्ष स्कौंपिओ गाडी क्र एमएच 31 ई के 0213 पाहणी केली असता सदर वाणामध्ये 1) 02 नग गाई गौवंश प्रती कि 15,000/- प्रमाणे एकूण 30,000/- रू 2)02 नग बैल गौवंश प्रत्येकी कि 20,000/- प्रमाणे एकूण किमत 40,000/- 3) 03 नग मृत बैल गौवंश कि 00/00 रू असा एकूण 70,000/- रू चे गौवंश यांना अत्यंत कुर व निर्यदयतेने डांबुन आकुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपु-य जागेत कोंबुन असल्याचे दिसले त्यावरून पंचासमक्ष सविस्तर घटनास्थळ जप्ती पंचनामा कार्यवाही मौक्यावर करून नमुद 1) स्कॉर्पिओ गाडी क्र एम एच 31 ई के 0213 किंमती- 3,00,000/- रू व 2)02 नग गाई गौवंश प्रती कि 15,000 /- प्रमाणे एकूण 30,000/- रू 3 ) 02 नग बैल गौवंश प्रत्येकी कि 20,000/- प्रमाणे एकूण किमत 40,000/- 4) 03 नग मृत बैल गौवंश कि 00/00रू असा एकूण 70,000/- रू असा एकूण असा एकुन 3,70,000 /- रुपये चा माल जप्त करण्यात आला सदर अज्ञात स्कॉर्पिओ अज्ञात वाहन चालका विरुद्ध कलम 279,429 भादवी सह कलम 11(1)(घ)(ड)(च) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अघि 1960 सह कलम 5 (अ). 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम 1995 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 सहकलम – 184 मो.वा.का प्रमाणे गुन्हा अन्वये गुन्हा दाखल केला असुन 02 नग गाई गौवंश, 02 नग बैल गौवंश व 03 नग मृत बैल गौवंश जनावरे पुढील देखभाल व्यवस्थे करीता मालू गौरक्षण गौशाळा कवठा ता सावनेर येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही विशाल आनंद पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा), अप्पर पोलीस अधिक्षक संदिप पखाले, बापू रोहम उप विभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग, सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि अमितकुमार आत्राम, सफौ किशोर ठाकरे, पोहवा दिनेश काकडे , नापोशि दिपक इंगळे , पोशि सचिन सलामे, चापोहवा गुणवंता डाखोळे पो.स्टे. केळवद यांनी केली आहे