कटारिया ऍग्रो कम्पनीला वारंवार लागणाऱ्या आगीची चौकशी ची मागणी!

– शनिवारच्या आगीत पुन्हा 4 कामगार जखमी?

वाडी :- सोनेगाव निपाणी ग्रा.प हद्दीत असलेली दिशांत भारत कटारिया यांच्या मालकीची कटारिया ऍग्रो बायोमास प्रॉडक्ट्स कंपनी शनिवारी रात्री पुन्हा एकदा आगीच्या विळख्यात सापडल्याने परिसरात खळबळ व चिंता दिसून आली असून ग्रा.प सदस्य विनोद लंगोटे यांनी या कम्पनिच्या कार्य व व्यवस्था प्रणालीच्या चौकशीची मागणी केली आहे.

वाडी नप चे अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे व सोनेगाव ग्रा.प चे जागरूक सदस्य विनोद लंगोटे यांनी या संदर्भात रात्री प्राथमिक माहिती देताना सांगितले की निशांत भारत कटारिया यांच्या मालकीच्या कटारिया ऍग्रो नामक कपणीत शनिवारी रात्री 11 च्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. आगी ची सूचना MIDC अग्निशमन विभागाला मिळताच 2 वाहने,नागपूर मनपा ची 2 अग्निशमन वाहने व वाडी नप ची अग्निशमन वाहने घटना स्थळी रवाना झाले.आगीची माहिती मिळताच सोनेगाव ग्रा.प चे सदस्य विनोद लंगोटे व अन्य नागरिक देखील घटना स्थळी मदतीला पोहचले.या कंपनीला आग लागण्याची वर्षभरात तिसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी आग लागता वेळी कँपणीत 12 ते 15 कामगार रात्रपाळीत ड्युटी वर उपस्थित होते. या कँपणीत सर्व कृषी विषयक व ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली.त्या मुळे सर्व कामगार वेगाने बाहेर पडले.मात्र यात स्वतः चा बचाव करताना 4 कामगार किरकोळ जखमी झाल्याचे समजते.रात्री 12 वाजे पर्यंत 8 अग्निशमन गाड्यावरील कर्मचाऱ्यानी जोरदार पणे कार्यवाही करीत ही आग नियंत्रणात आणली. लक्षात असू द्यावे की याच कम्पनित 15 दिवसा पूर्वी भीषण आग लागून 4 कर्मचारीचा भाजून मृत्य झाला होता व काही कर्मचारी जखमी झाले होते.त्या नंतर अधिकारी व विविध विभागाणी या कम्पनी ची पाहणी केली होती.असे असतानाही पुन्हा कशी आग लागली,अशा आगीमुळे कामगारांचा जीव तर धोक्यात येतोच गावात ही प्रदूषण व आरोग्याचा प्रश्नन निर्माण होतो. एका वर्षात ही तिसरी आगीची घटना आहे,आग लागतेच कशी? असा प्रश्नन ग्रा.प सदस्य विनोद लंगोटे यांनी उपस्थित करून उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे प्रतिपादन

Mon May 29 , 2023
मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com