– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 8 :- महाराष्ट्र राज्य वरटी परिट धोबी समाज महासंघ च्या वतीने 4 ते 7 मार्च पर्यंत कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा अंतर्गत विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होतो ज्यामध्ये विशेषतः महिला व लहान मुलांचा खेळ सहभाग होता.या महोत्सव समापन प्रसंगी भाजी मंडी धोबी घाट येथे संत गाडगेबाबा यांची पूजा अर्चना करीत दहीकाला वितरित करण्यात आले तसेच भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला तसेच रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या क्रिकेट स्पर्धेत विजेता टीम कनोजिया एफ सी ला प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते नगदी 25 हजार रुपये देऊन सम्माणीत करण्यात आले.व रनअप टीम किंग 7 क्रिकेट क्लब ला 15 हजार रुपये नगद पुरस्काराने सम्माणीत करण्यात आले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिट(धोबी)महासंघ चे संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के , छावणी परिषद कामठी चे सी ओ – साणप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, भैय्या रोहनकर, मोतीकर, छोटू निर्मलकर, रमेश कनोजिया, निलकंठराव भोयरकर, चुणीलाल, बंडू कनोजिया, महेश कनोजिया, विशाल कोतपल्लीवार, दुर्गप्रसाद शिवपेठ, आनंद मांमडीवार, भोसकर, घनश्याम क्षीरसागर, रमेश क्षीरसागर, शंकर माम्डीवार, दीपक अण्णा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितो चे संजय कनोजिया, श्रावण केळझरकर, कपूरचंद कनोजिया, रमेश कनोजिया, विजय कोंडुलवार, रितेश सुट्टलवार, राजरोशन क्षीरसागर, राहुल कनोजिया, विजय कनोजिया , रंगीलाल जैस्वाल, राकेश कनोजिया, आकाश कनोजिया, संदीप कनोजिया कार्तिक केळझरकर, पवन कनोजिया,मुकेश कनोजिया, नितीन कनोजिया, यशपाल गँगराज, सचिन कनोजिया , मोनू कनोजिया आदींनी केले.
कार्यक्रमाचे मंच संचालन विजय कोंडुलवार तर आभार प्रदर्शन राजरोशन क्षीरसागर व राहुल कनोजिया यांनी केले
कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा जयंती महोत्सव
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com