आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
कन्हान : – पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा शिवार ओवर ब्रिजच्या खाली कराटे शिक्षकाने शिक्षक पेक्षा ला मलीन करीत अल्पवयीन अकरा वर्षाच्या विद्यार्थी नी वर प्रशिक्षण देण्याचा नावावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करित पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.१) एप्रिल ते (दि.२) जुन च्या सायंकाळी ५ वाजता दरम्यान नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील खंडाळा शिवार ओवर ब्रिज च्या खाली कन्हान येथे ११ वर्षीय पीडीत विद्यार्थीनी ला गोपाल रामेश्वर गोंडाने वय ४० वर्ष राह. नारायण विद्यालय जवळ विवेकानंद नगर कन्हान येथील कराटे मास्तर हा रोज ४ ते ५ पर्यंत रनिंग व्याया म व ७ ते ८ कराटे क्लास शिकवायचा. गोपाल गोंडाने याने मुलीला नेहमी प्रमाणे त्याच्या मोटार सायकल वर बसवुन नागपुर जबलपुर सर्विस रोड वरील ओव्हर ब्रिज खाली सिमेंटच्या ओट्याजवळ नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. सदर प्रकरणाचे गाभीर्य लक्षात घेत नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला भेट देऊन त्यांनी अधिका-यांशी चर्चा करून कार्यवाहीचे निर्देश दिले.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तोंडी तक्रारी वरून आरोपी गोपाल गोंडाने यांचे विरुद्ध कलम ३७६ , ३७६ (२) (र), ३७६ (२), ३७६ (इ), ३७६ (२) (द), ३५४, ५०६ भादंवि सहकलम ४, ८, १०, १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या न्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपी गोपाल गोंडाणे ला अटक करण्यात आली असुन पुढील तपास नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, उपविभा गीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, कन्हान पोली स निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात खापर खेड़ा पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मी मल्कुवार पुढील तपास करीत असुन या व्यतिरिक्त आणखी पिडीत विद्यार्थीनी च्या तक्रारी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.