नागपूर :- बामसेफ, बीआरसी, डीएस-फोर व बीएसपी चे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांचा 17 वा स्मृतिदिन 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता देशपांडे सभागृहात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रभारी डॉ अशोक सिद्धार्थ, दुसरे प्रदेश प्रभारी नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने, स्थानिक प्रदेश प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज एड सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
याप्रसंगी प्रामुख्याने प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजना ढोरे, पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, राजीव भांगे, नितीन शिंगाळे उपस्थित राहतील.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर जिल्हा, शहर, विधानसभा स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राबत आहेत. कांशीराम स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हीतचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.