कन्हान :- संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ११४ गोवारी शहिदांना मानवदना म्हणुन आदिवासी गोवारी शहिद स्मारक समिती नागपुर व्दारे कन्हान संविधान कक्ष प्रमुख आनंद सहारे यांना संविधान प्रत भेट देऊन संविधान कक्ष सुरु करून संविधान सन्मान जागर कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
आदिवासी गोवारी शहिद स्मारक समिती झिरो माईल, नागपुर व्दारे संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ११४ गोवारी शहिदांना मानवदना म्हणुन ११४ गावातुन संविधान सन्मान जागर कार्यक्रम घेऊन त्या गावात संविधान कक्ष सुरु करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत असुन त्याच मालिकेतील १० वा कार्यक्रम नागपुर जिल्ह्यातील कन्हान शहर ता. पारशिवनी येथे घेण्यात आला. यावेळी कन्हान येथील गोवारी स्मारका वर ११४ आदिवासी गोवारी शहिद बांधवांना अभिवाद न करण्यात आले. याप्रसंगी खासदार श्यामकुमार बर्वे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष शालिक नेवारे यांच्या हस्ते संविधान कक्ष प्रमुख आनंद सहारे यांना संविधान प्रत भेट देऊन संविधान कक्ष सुरु करण्यात आला. या कार्यक्रमास शेखर लसुंते, नंदकिशोर कोहळे, नेवालाल सहारे, भास्कर राऊत, नरेश कोहळे, सरिता लसुंते, ब्रम्हानंद नेवारे, मारोती गाते, श्यामराव सोनवाने,गणेश राऊत गुरुजी, ऋषभ बावनकर आदी मान्यवर प्रामु ख्याने उपस्थित होते.