कन्हान ला महिला दिवसी विविध कार्यात कार्य करणाऱ्या महिलांचा व युवतींचा सत्कार

 कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन. 
 
कन्हान : – शहर विकास मंच द्वारे जागतिक महिला दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरो ग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करण्या त आले असुन मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले,राज माता जिजाऊ व झांसीची रानी लक्ष्मीबाई यांचा प्रतिमे चे पुजन करून विविध कार्यात कार्य करणाऱ्या महि ला व युवतींचा सत्कार करून जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला.
         मंगळवार (दि.८) मार्च जागतिक महिला दिवसा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आयुषी चौधरी व प्रमुख अतिथी डॉ सर्वत हैद्री, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, माजी नगराध्यक्षा आशाताई पनिकर, मुख्याध्यापिका विशाखा ठमके, शिक्षिका वर्षा सिंगाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व झांसीची रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करू न कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिला दिवसा निमित्य उपस्थि तांना मार्गदर्शन केले. यावेळी परमात्मा एक दांड पट्टा निमखेडा च्या सेजल बावने, उर्वशी मल्लेवार, साक्षी सुर्यवंशी, वंशीका वक्कलकर, एक वादळ प्रत्येक घरी राष्ट्रगान करिता कार्य करणारी छकुली वासाडे, माॅडलिं ग शो मध्ये उत्कृष्ट कार्य करणारी कल्याणी सरोदे, प्राची नारनवरे या युवतींचा आणि पिंकी श्रीवास्तव, सुनिता कारेमोरे, विशाखा बोरे या दिव्यांग महिलांचा मान्यवरांचा हस्ते नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तदंतर उपस्थित सर्वांना अल्पोहार वितरण करून जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी, सिस्टर फरहाणा सय्यद, जोगळेकर, श्रीमती कंभाले, श्वेता मेश्राम, श्रीमती लील्हारे, शिव भारत २४ चे पत्रकार निलेश गाढवे, सामाजिक कार्य कर्ता प्रशांत मसार, केतन भिवगडे, अश्विन भिवगडे, संदीप चिंचुलवार, मोहन वखलकर सह नागरिक बहु  संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, मार्गद र्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, सदस्य हर्ष पाटील,  शाहरुख खान, हरीओम प्रकाश नारायण सह मंच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले. कार्य  क्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी मानले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शुक्रवार पासून झुंड कामठीत

Wed Mar 9 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी प्रतिनिधी ९ मार्च–निर्माता निर्देशक नागराज मंजुळे निर्मित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड हा चित्रपट कामठी शहरातील एकमेव गोयल टॉकीजमध्ये तातडीने प्रदर्शित करण्यात यावा या मागणीचे निवेदन भाजपा कामठी शहर च्या वतीने गोयल टॉकीज चे संचालक रवी गोयल यांना आज सकाळी देण्यात आले शिष्टमंडळात भाजप पदाधिकारी संजय कनोजिया, जितेंद्र घोडेस्वार, उज्ज्वल रायबोले, विक्की बोंबले, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!