कन्हान ते आमडी फाटा महामार्गावर कोळसा, रेती वाहतुकीने धुळीचे साम्राज्य

– महामार्गावर धुळ प्रदुर्शनाने अपघात वाढले तरी संबधित अधिकारी गप्प का ? 
कन्हान : – परिसरातील महामार्गावरून कोळसा, रेती ची ट्रकाने निमय बाहय जड वाहतुक बिनधास्त सुरू असल्याने महामार्गावर व लगत कोळसा, रेतीची धुळ साचुन येणा-या जाणा-या वाहनाने रस्त्यावर उडत अस ल्याने चारचाकी, दुचाकी वाहनाना समोरील काहीच दिसत नसल्याने अपघात होऊन निर्दोष लोकांना अपं गत्व किवा जिव शुध्दा गमवावा लागत असल्याने संब धित प्रशासन अधिका-यांनी निद्रा अवस्थेतुन जागे होऊन धुळ प्रदुर्शन करणा-या वाहनावर कायदेशिर कार्यवाही करून धुळ प्रदुर्शनावर नियंत्रण करण्यात यावे.
         नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील कन्हान नदी पुल ते आमडी फाटा पर्यंत राष्ट्रीय महामार्गाने कोळसा व रेतीची नियम बाहय म्हणजे १० ते २० चाकी ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त कोळसा व रेती भरून टाळपत्रीने व्यवस्थित न झाकता वाहतुक करण्यात येत असल्याने कोळसा, रेतीची बारीक कणा ची धुळ उडत असल्याने छोटया वाहन चालकांना सामोरचे काहीच दिसेनाशे होते. तर कधी डोळयात जावुन अचानक सामोरचे काहीच दिसत नसल्याने वाहन चालकाचे संतुलन बिघडुन अपघात होत आहे. रस्त्यावर व लगत धुळ साचुन असल्याने वाहनाची चाके घसरून सुध्दा अपघात वाढत आहे. कन्हान नदी व पेंच नदीतुन मोठया प्रमाणात रेती (वाळु)उपसा होत ट्रकने वाहतुक सुरू आहे. तसेच वेकोलि कामठी, इंदर, गोंडेगाव या तीन्ही खुल्या कोळसा खदान मधुन डुमरी रेल्वे कोळसा यार्ड मध्ये आणि इतर ठिकाणी ट्रकने कोळसाची वाहतुक याच महामार्गाने होत असल्याने महामार्गावरील टेकाडी नविन वसाहत ते अण्णा मोड डुमरी, आमडी फाटा पर्यंत मोठया प्रमाणात कोळसा रेतीची धुळीचे प्रदुर्शन दिवसरात्र होत असल्याने इतर ये-जा करणा-या वाहन चालकाना या उडणा-या धुळी मुळे भयंकर त्रास सहन करावा लागत असुन टेकाडी नविन वसाहत ते टेकाडी बस स्टाप व केरडी, डुमरी स्टेशन ते अण्णा मोड, आमडी फाटा पर्यंत राष्ट्रीय महा मार्गावर कोळसा व रेतीच्या बारीक कण मिश्रीत धुळ प्रदुर्शन मोठया प्रमाणात असल्याने या ठिकाणी अप घाताचे दिवसेदिवस प्रमाण वाढु लागले आहे. ट्रकाच्या उडणा-या धुळीने वाहन चालकांना सामोरील काहीच दिसत नसल्याने वाहन चालकांचे संतुलन बिघडुन अपघात होऊन निर्दोष लोकांना अपंगत्व आणि जिव हानी सुध्दा होत आहे. करिता राष्ट्रीय महामार्ग अघिका री, महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंडळ अधिकारी, आरटी ओ अधिकारी, वाहतुक पोलीस तसेच सर्व संबधित अधिका-यांच्या दुर्लक्षतेमुळे महामार्गावर धुळ प्रदुर्शन वाढुन अपघात वाढत असल्याने संबधितानी कर्तव्य दक्ष पणे कामगिरी बजावुन कन्हान नदीपुल ते आमडी फाटा राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील कोळसा, रेती धुळ प्रदुर्शनावर त्वरित नियंत्रणात करावी अन्यथा येणा-या उन्हाळयात या धुळ प्रदुर्शनाने अपघाताच प्रमाण आटोक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी मागणी या महामार्गाने प्रवाश करणा-या प्रवाशी तसेच परिसरातील ग्रामस्थाच्या चर्चेतुन सामोर येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पुण्यातील दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Fri Feb 4 , 2022
जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश मुंबई, दि. ४:- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत. इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com