कन्हान :- शहरात कुठले ही मोठे तिर्थ व पर्यटन स्थळ नसताना सुध्दा शहरात व नागपुर जबलपुर रोड, नागपुर बॉयपास रोड, तारसा रोड, गहुहिवरा रोड, बोरडा रोड, परिसरातील १० किमी अंतरावर जवळपास २५ लॉज ची भरमार आहे. चार ते पाच लॉज सोडले तर बाकीच्या लॉजवर प्रवाश्या १२ किंवा २४ तास राहण्या स चाय, नास्ता व जेवणाची व्यवस्था सुध्दा नाही. हे लॉज अवैद्य व्यवसाय करित असतात. अश्याच एका महामार्गावर टेकाडी शिवारातील रेनबो लॉज मध्ये चोरी-लपीने चालणा-या अवैध देह व्यापारावर कन्हान पोलीसानी धडक कार्यवाही करून दोन आरोपीला अटक करून ५१८२४ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
रविवार (दि.१९) जानेवारी २०२५ ला गोपनिय माहिती प्राप्त झाली की, कन्हान हद्दीतील जबलपुर नागपुर रोडवरील टेकाडी शिवार रेनबो लॉज मध्ये लॉ ज मालक मनोहर हुड हे आपले लॉजवर लोकांकडुन पैसे घेवुन चोरी-लपीने अवैधरित्या कुटंनखाना चालवि त आहे. या खबरेची शहानिशा व कायदेशिर कार्यवाही करणेकरिता पंचाना बोलावुन गुप्त मिळालेल्या बातमी ची परिपुर्ण माहीती देऊन रेडकामी सोबत अधिकारी सपोनी रोशन बावणकर, सपोनी राहुल चव्हान सह दोन महीला कर्मचारी व स्टॉपसह फंटर ला बोलावुन हकिगत सागुन बनावट गिन्हाईक म्हणुन कुटंनखाना सुरू असलेल्या ठिकाणी जावुन रॅनबो लॉज मालक व कॉंउटर वरील इसमास भेटुन शारीरीक सबंध करणेक रिता बोलुन सौदा झालेवर त्यांचेजवळ देण्यात आलेले १००० रू पैकी ठरलेल्या सौदयाप्रमाणे रक्कम लॉज मालकास देवुन शारिरीक सबंधाकरिता खोलीत जाता च मोबाईल फोन ने मिसकॉल देवुन सुचना देण्याचे पंचासमक्ष सांगुन पोलीस स्टेशन वरून रवाना झाले. ठरल्याप्रमाणे फंटरने मोबाईलवर ५.४० वाजता मिस कॉल दिला. लगेच सर्व स्टॉप व पंचासह नागपुर जबल पुर राष्ट्रीय महामार्ग क. ४४ टेकाडी शिवार रोड लगत असलेला न्यु रेनबो लॉजींग अँन्ड बोर्डोंग येथे पोहचले, पंचासमक्ष लॉजमधिल ग्राउंड फ्लोअर खोली क.२ ची पाहणी केली असता सापळा कार्यवाही कामी पाठवि लेला फंटर हा खोली क्र.२ मध्ये मिळुन आला. खोलीत मिळुन आलेल्या महीलेस सोबत असलेल्या महीला कर्मचारी पो.हवा विणा धुल यांनी विचारपुस केली असता तिने सांगितले मला लॉज मालक मनोहर यांनी देहविकी करिता बोलाविल्यावरून आली. लॉजमध्ये आलेल्या ग्राहकांना लॉज मॅनेजर वेदांत लंगड आणि लॉज मालक मनोहर चिरकुट हुड वय ४७ रा. टेकाडी हे पैसे घेवुन ग्राहक माझे कडे खोलीत पाठवितात. त्यांचे सांगणे प्रमाणे ग्राहक सोबत देहव्यापार करणे साठी खोलीत होते. लॉज मालकाचे ताब्यातुन कॉउंटर मध्ये एकुण १६२९० रू मिळून आले. त्यातील ५०० रूपयाचा नोटाची पाहणी केली असता फंटरला रेड कामी वापरण्यास दिलेल्या ५०० रू. च्या ०२ नोटा मिळुन आल्या. सोबत तिन मोबाईल किमत ३०,००० रू, नोंदी रजिस्टर अंदाजे कि. ५०० रू, सि.सि.टि.व्ही कॅमेराचे DVR कि. अंदाजे ५००० रू. कँन्डोमचे पॅकेट कि. ३४ रू. अशा एकुण ५१,८२४ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वर नमुद आरोपीतांनी आपले स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता पीडीत मुलीला अधिक पैशाचे आमीष दाखवुन बाहेर जिल्हयातुन कन्हान येथे बोलावुन तिला देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले तसेच आपले स्वतःचे मालकीचे न्यु रेनबो लॉज मध्ये पीडीत मुलीला ग्राहकांस पूरवुन देह व्यापार करून घेतांना मिळुन आल्याने आरोपीचे कृत्य हे कलम ३, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनीयम १९५६ प्रमाणे होत असल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र. ४४/२५ अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीताना अटक केली असुन पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोहार व अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमा ळ यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड सह व.पो.नी. राजेद्र पाटील, सपोनी राहुल चव्हाण, सपोनी रोशन बावणकर, पो ह वा हरीश सोनभद्रे, मपोहवा विना थुल, मपोशी स्वाती चव्हाण, पोना अमोल नागरे, पोना महेश बिसने, पोशि अश्विन गजभिये. पोशि आकाश शिरसाट, पोशि. सुशि ल तेलंग, पोशि. मोहीत झाडे, चापोहवा सतिश तलेवार आदीनी शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.