कन्हान :- सार्वजनिक श्री श्री मॉ दुर्गा उत्सव कमेटी व्दारे माहोरे कॉम्प्लेक्स कन्हान येथील बंगाली देवी उत्सवास २५ वर्ष पुर्ण झाल्याने यावर्षी कमेटी विधी वत पुजा अर्चनासह मॉ दुर्गा, मॉ लक्ष्मी, मॉ सरस्वती, श्री कार्तिक, श्री गणेश मुर्तीची स्थापना करून विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुक्रवार (दि.२०) ऑक्टोंबर पासुन बंगाली देवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक श्री श्री माँ दुर्गा उत्सव कमेटी माहोरे कॉम्प्लेक्स शास्त्री चौक, कन्हानव्दारे शुक्रवार (दि. २०) ऑक्टोंबर ला सकाळी ९.३० वाजता बंगाली देवी मॉ दुर्गा मुर्तीची स्थापना करून बंगाली पुजारी व्दारे आरती व बंगाली ढाकी सह महोत्सवाची सुरूवात करण्यात येईल. या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धुनुची डांस, मुलांचे नुत्य, गायन स्पर्धा, दुर्गा चालीसा पाठ आणि भोग, प्रसाद वितरणची व्यवस्था कमेटीने केली आहे.
शनिवार (दि.२१) ला सकाळी ९.३० वा. महासप्तमी पुजन,स. १०.३० वा. बलिदान, दु.१२.३० वा. पुष्पाजं ली, दु. २.३० वा. भोग व प्रसाद, सायं.७वा आरती. रविवार (दि.२२) ला स. ९.३० वा. महाअष्टमी पुजन, स.११.३० वा. बलिदान, स. ११.५० वा. पुष्पा जंली, दु.२.३० वा. भोग व प्रसाद, सायं.५.१५ वा.संधी पुजन, ५.३० वा. बलिदान, ५.४५ वा. पुष्पाजंली, सायं. ७ वा. आरती. सोमवार (दि.२३) ला स.९.३० वा. महा नवमी पुजन, स.१०.३० वा. बलिदान, स.११ वा. पुष्पा जंली, दु. १२.३० वा. हवन, दु.२ वा. कुमारी पुजन, दु. २.३० वा. भोग व प्रसाद, सायं. ७ वा.आरती. मंगळवार (दि.२४) ला स.९.३० वा. दशमी पुजन, स.१०.३० वा. दर्पण विसर्जन, सायं.५.३० वा बोरोन व शिंदुरदान. बुधवार (दि.२५) ला दु. २.३० वा. मुर्ती विसर्जन. शनि वार (दि.२८) ला सायं. ७ वा. कोजागिरी लक्ष्मी पुजन, ८.१५ वा. भोग व प्रसाद. बुधवार (दि.१४) फेब्रुवारी २०२४ ला स. ९.४५ वा. सरस्वती पुजन, स. ११.३० वा. पुष्पाजंली, दु. २.३० वा. भोग व प्रसाद वितरण करून समारोप करण्यात येईल. बंगाली देवी महोत्स वाच्या यशस्विते करिता सार्वजनिक श्री श्री माँ दुर्गा उत्सव कमेटी माहोरे कॉम्प्लेक्स कन्हान चे पदाधिकारी, सदस्य व नगरवासी परिश्रम घेत सहकार्य करित आहे.