कन्हान ला हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय जे एन रोड कन्हान येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त १०१ किलो बुंदी व फळ वितरण करून जयंती साजरी करण्यात आली.

मंगळवार (दि.२३) जानेवारी २०२४ ला शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय जे एन रोड ब्रुकबांड कंपनी समोर कन्हान येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेला नगरसेवक गट नेता मनिष भिवगडे, जेष्ट शिवसैनिक दिलीप राईकवार, महेंद्र भुरे, गणेश भोंगाडे आदीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बंटी हेटे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना व शिवसैनिका सह मराठी माणुस आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती उपस्थिताना दिली. कार्यक्रमाचे आयोजक सचिन साळवी, बेटी हेट, रुपेश सातपुते यांच्या व्दारे महामार्गाने ये-जा कर णा-या नागरिकांना १०१ किलोचा बुंदा व उपस्थिता ना फळ आणि अल्पोहार वितरण करून मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता पुरुषोत्तम येणेकर, शिव स्वामी, प्रकाश निमोडे, हफीज शेख, शितल भिमणवार, आशिष वाडकर, राजन भिसेे, जितेन्द्र तिवारी, अनिल बारई आदिनी सहकार्य केले.

शिवसेना (उ.बा.ठा.) कार्यालय तारसा रोड कन्हान 

हिंदु हृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कन्हान शहरातील शिवसेना (उ.बा.ठा.) कार्यालय तारसा रोड येथे विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख यांचे मार्गदर्शनात उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्ग दर्शन केले. याप्रसंगी कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावणे, जेष्ट शिवसैनिक अंबादास खंडारे, सुत्तम मस्के , नेवालाल पात्रे, लंगडा शेंडे, भुरा पात्रे, ईश्वर शेंडे, महेंद्र खडसे, सावन लोंढे, सन्नी पात्रे, बादल लोंढे, सावण लोकडे, सतिश नाडे, सागर पात्रे, संजय पात्रे सह पदाधिकारी व शिवसैनिक बहु संख्येने उपस्थित राहुन बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रमाई सार्वजनिक ग्रंथालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन संपन्न

Wed Jan 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- गणेश नगर येथिल रमाई सार्वजनिक ग्रंथालय येथे अमर बागडे व डॉ दीपक रामटेके हयानी स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याना आयएएस, एमपी एससी चे मौलिक मार्गदर्शन केले. रमाई सार्वजनिक ग्रंथालय गणेश नगर कन्हान येथे विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षेची तयारी कशी करावी आणि आयएएस, एमपीएससी यासाठी कसे प्रयत्न करावे. याचे अत्यंत मौलिक मार्गदर्शन अमर बागडे स्टेशन मॅनेजर खापरखेडा आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!