संदीप कांबळे, कामठी
-कारवाईची गरज मात्र प्रशासनाची डोळेझाक
-बोगस डॉक्टरांचा रुग्णाच्या आरोग्याशी खेळखंडोबा
कामठी ता प्र 5:-कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे जाळे पसरले असून मागच्या वर्षी सहा मे ला स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन च्या पोलिसांनी सैलाब नगर कामठी येथे एका बोगस धर्मार्थ दवाखान्यावर धाड घालण्यात यश गाठले होते.यासारख्या बोगस डॉक्टरांचा खेळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असून हे डॉक्टर सर्वच आजारावर औषधी देत असल्याचे चित्र आहे.मात्र आरोग्य विभाग यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.अश्या प्रकारच्या डॉक्टरवर कारवाईची गरज निर्माण झाली असताना प्रशासनाची डोळेझाक भूमिका समोर येत आहे.
या वाढत्या उन्हाळ्यात नागरिकाना अनेक आजार झाले असून साथीचे रोग बळावण्याचाही धोका आहे अशातच हे डॉक्टर या सर्व आजारावर उपचार करताना दिसून येत आहेत.कुठल्याही प्रकारचा आजार दिसून आल्यास रुग्णालयात जाण्याऐवजी या बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेणे सुरू आहे.या प्रकारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.तेव्हा या बोगस डॉक्टरवर कारवाही करणार कोण?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
-अधिकांश बोगस डॉक्टर बाहेरील राज्यातील
तालुक्यातील या बोगस डॉक्टरमध्ये बाहेर राज्यातील बोगस डॉक्टरांचा समावेश आहे.बोगस डिग्री वा प्रमाणपत्रे दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जाते.काहिकडे तर केवळ डिप्लोमा आहे आणि त्यांना परवानगी नसतानाही स्वता डॉक्टर असल्याची बतावणी करून दुकानंदारी सुरू केली आहे.