संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड गावातील एका शेतशिवारात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान निदर्शनास आली असून अनोळखी मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही तर ही घटना अंदाजे जवळपास 10 दिवसापूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मृतदेह पूर्णता कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतकाची दुर्गंधी पसरल्याने सदर घटना निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल मोतींगे, संजय पिल्ले, राजू टाकळीकर, आदींनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर या घटनेने ही आत्महत्या की हत्या याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.