कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वासुदेव गुरनुले यांचा निरोप कार्यक्रम संपन्न

नागपूर :- अमर सेवा मंडळ द्वारा संचालित कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वासुदेव बालाजी गुरनुले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी कमला नेहरू महाविद्यालयात अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ.  सुहासिनी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अमर सेवा मंडळाचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड.  अभिजित वंजारी आणि अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वासुदेव बालाजी गुरनुले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय डॉ. सुहासिनी वंजारी यांच्या शुभहस्ते शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. वासुदेव गुरनुले यांनी महाविद्यालयातून केमेस्ट्री विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बक्षिस जाहीर केले व त्याकरिता त्यांनी रू. एक लाखाचा धनादेश संस्थेच्या अध्यक्षांना सुपूर्द केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी केले. संचालन प्रा. वंदना खराबे यांनी केले तर आभार डॉ. ममता वाघ यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाडक्या बहिणींचा वैशाली सावंतच्या गाण्यांवर ठेका, नम्रता आणि प्रसाद सोबत धम्माल

Sun Sep 1 , 2024
नागपूर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आज नागपुरात शुभारंभ झाले. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने व नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रेशीमबाग येथील मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत ‘लाडक्या बहिणींनी’ उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात उपस्थित भगीनींसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आली होती. सुप्रसिद्ध गायीका वैशाली सावंत यांची बहारदार गाण्यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com