संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठीत धडकले बाल कामगार आयुक्त पथक
– कामठी तालुक्यात बालकामगार मुक्तीसाठी धाड
कामठी :-14 वर्षाखालील अल्पवयीन बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना कामठी तालुक्यातील विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल कामगार आढळून येत असल्याची गुप्त माहिती अप्पर आयुक्त बाल कामगार विभाग नागपूरला मिळताच अशा बालकाच्या सुटकेसाठी बाल कामगार विभाग अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर च्या पथकाने कामठी शहरातील जवळपास चार ठिकाणी धाड घातली. मात्र या धाडसत्रात 14 वर्षाखालील बालकामगार दिसुन आले नाही परिणामी पथकाला केलेल्या धाडीच्या कार्यवाहीत निरंक अशी नोंद करण्यात आली.मात्र बाल कामगार पथक इतक्यातच थांबणार नसून पूर्ण तालुका पिंजू न काढून बाल कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला कायद्याचा हिसका दाखवून बाल कामगारांची सुटका करूनच मोकळा श्वास घेणार असल्याची माहिती पथकातील अधिकारी ऊ.च ,सूर्यवंशी यांनी दिली.
आज शुक्रवार दिवस कामठी शहरातील आठवडी बाजार असल्याचे निमित्त साधून येथील किराणा दुकान, कापड दुकान,हॉटेल अशा ठिकाणी थेट धाड घालून काम करीत असलेल्या कामगारांची नोंद करीत अल्पवयीन बालकाच्या वयासारखे दिसणाऱ्या कामगारांची वयाचे प्रमाण ठरविण्यासाठी त्यांच्याकडे असलेले आधार कार्ड सह इतर दस्तावेजची शहनिशा करण्यात आली.याप्रसंगी या धाड कारवाहित अप्पर बाल कामगार आयुक्त कार्यालय चे -ऊ च सूर्यवंशी, वी लांडे, निशांत सिंगाडे, प्रसेंनजीत गायकवाड, इंडियन सोशल सर्व्हिस युनिट ऑफ एज्युकेशन नागपूर चे प्रकाश फुलकुवर,वर्षा पाटील सह महिला व बाल विकास समिती च्या मीनाक्षी धरदाडे,पोलीस विभागाचे अंकुश गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.
बालकामगार ठेवणे ही बाब कायद्याने गुन्हा असतानाही काही उद्योग मालक कमी वयात मुलांकडून काम करून घेण्याची जणू प्रथाच सुरू केली आहे तेव्हा या प्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी बाल कामगार अप्पर आयुक्त कार्यालयाने कंबर कसली आहे.