कामठीत शिवसेना शिवसंपर्क अभियान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 कामठी :- कामठी शिवसेना (उबाठा) शिवसंपर्क अभियान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपन्न झाले. कामठी विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख गिरीश विचारे यांचे उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व बुथप्रमुखांपर्यंत पोहचण्याचा व महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी तसेच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय व महाराष्ट्रातील यशस्वी कुटुंबप्रमुख म्हणून या राज्यातील जनतेची घेतलेली काळजी व विश्र्व महामारीतुन या महाराष्ट्राला अतिशय उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शिवसेना पदाधिकार्यांनी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.

याप्रसंगी बैठकीला उपस्थित जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, जिल्हा संघटकप्रमुख राधेश्याम हटवार यांनीही मनोगत व्यक्त केले.मंचावर शहरप्रमुख मुकेश यादव, तालुका संघटक पंकज सोर, युवासेनाप्रमुख अल्पेश पाटील, महिला आघाडी प्रमुख माधुरी  बावनकुळे, कामगार सेनेचे मनोहर अगुटले, राजु बावनकुळे,समीर सोनारे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराग जोशी यांनी केले.या बैठकीला प्रामुख्याने सुनील काटगाये, निहालसिंग चौधरी,मुन्ना प्रजापती, रमेश वैद्य, सुरज दास, सुंदरसिंग रावत, आशिष कावळे,रितेश केजरकर, महादेव बावनकर, शिव यादव, जितेंद्र गुर्जर, महेश तालेवार, आकाश टेंभुर्णे, जितु वाईलकर, रितेश पाटील,सुरज कामठे, संदेश सारोकार,मनोज पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचा शेवट सामुहिक राष्ट्रगीताने करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरात निघाली भव्य तिरंगा रॅली, विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Sat Aug 12 , 2023
चंद्रपूर :- माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक आझाद बगीचा दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. सर्व शालेय मुलांनी हातात राष्ट्रध्वज उंचावुन मनपा कार्यालय गांधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com