कामठी चा राजाचे थाटात विसर्जन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात विराजमान कामठी चा राजा चे थाटात मिरवणूक काढून महादेव घाट कॅन्ट कामठी येथे विसर्जन करण्यात आले.

श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी येथील शैक्षणिक परीसरात मागील १० दिवस कामठी चा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी विधीवत गणेश मुर्तीची पुजा करुन विसर्जन मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.

मिरवणूक संस्थेच्या नवीन कामठी येथील शैक्षणिक परीसरातून ढोल ताशा, बॅन्ड, डिजे च्या जल्लोषात कामठी शहरात भ्रमण करीत महादेव घाट येथे विसर्जन करण्यात आले.

या विसर्जन मिरवणूकीला प्रामुख्याने संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर, उपाध्यक्षा अनुराधा भोयर, कार्यकारी संचालक अनुराग भोयर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप कोहळे, शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रुपाली पाटील, पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ ईशा मुद्लीयार, गादा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल हेमके त्याचप्रमाणे संस्थेद्वारा संचालित सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर,निवासी डॉक्टरांकरिता आवश्यक सोयी- सुविधांसाठी निधी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Sep 18 , 2024
– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालयास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी साधला संवाद – ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ उपक्रमाचे कौतुक छत्रपती संभाजीनगर :- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com