संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी-पारडी वाहतुक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुचाकी तसेच तीन सीटर ऑटो चालकाकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करून जोमात वाहतूक सुरू असल्याची जाणीव पोलीस निरीक्षक दिपक गोसावी यांना निदर्शनास येताच या बेशिस्त वाहतूकदाराणा वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक करा यांची जाणीव करून देण्यासाठी 23 ऑगस्ट ला वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली. या एक दिवसीय मोहिमेत 91 बेशिस्त वाहतुकदारावर दंड आकारला ज्यामध्ये 35 तीन सीटर ऑटो तर 56 दुचाकी जप्त करण्यात आल्या या 91 बेशिस्त वाहतूक दाराकडुन एकाच दिवशी 1 लक्ष 87 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कामठी पारडी मार्गावर वाहनाचे परवाने न बाळगता बेशिस्तपणे भरधाव ऑटो चालवणे, ऑटोचालक पोशाख न वापरने अशा कित्येक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्त वाहन धारकावर पोलिसांनी कारवाहीचा बडगा उभारला त्यामुळे वाहतूक पोलीस स्टेशन ला तीन सीटर ऑटो तसेच दुचाकीच्या चांगल्याच रांगा लागल्या होत्या. तर या कारवाही मुळे सर्वसामान्य नागरिकांत समाधानाची आशा पसरली आहे.