संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सद्रक्षणाय – खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते.त्यानुसार प्रत्येक सणोत्सवदरम्यान उत्सव योग्यरीत्या पार पाडण्यासाठी पोलिसांवर जवाबदारी असते दरम्यान पोलिसाना कोणतेच सण उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो.
प्रत्येकवेळी कोणत्याही उत्सवाच्या वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर राहावे लागते मात्र नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन मध्ये श्री गणेशमूर्तीचे विराजमान करीत श्री गणेश मूर्तीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करीत मनमुराद आनंद लुटला.
नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.दरम्यान दहा दिवस दररोज पोलिस अधिकारी, कर्मचारीच्या हस्ते आरती करीत गणेशोत्सव साजरा केला.दहा दिवसिय गणेशोत्सवाचे विसर्जन कार्यक्रम होणार असल्याने पोलिसांना बंदोबस्तावर हजर राहावे लागणार होते त्यामुळे श्री गणेश विसर्जन मध्ये पोलिसांनी कर्तव्यदक्ष भूमिका बजावून दुसऱ्या दिवशी नवीन कामठी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या श्री गणेश मूर्तीचे थाटात विसर्जन करण्यात आले.
यावेळी विसर्जन दरम्यान सर्व पोलिसांनी फेटे बांधत , वाद्याच्या तालात श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढत जल्लोषात विसर्जन करण्यात आले.
याप्रसंगी श्री गणेशमूर्ती विसर्जनात नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दीपक भिताडे,दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, यासह पोलीस अधिकारी कर्मचारिसह बिट मार्शल व इतर कर्मचारी उपस्थित होते.