संदीप कांबळे, कामठी
– घरकुल लाभार्थ्यांनी डेमो हाऊस ची पाहणी करून दर्जेदार बांधकाम करा-बीडीओ अंशुजा गराटे
कामठी ता प्र 27 :- कामठी पंचायत समिती मध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात मिळणाऱ्या घरकुलाचे प्रात्यक्षिक गृह , आदर्श घरकुल(डेमो हाऊस)बांधण्यात आले आहे.तेव्हा लाभार्थ्यांनी सदर डेमो हाऊस ची पाहणी करून घरकुलाचे दर्जेदार बांधकाम करावे असे आव्हान कामठी पंचायत समिती च्या वतीने गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर तसेच कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी पंचायत समिती स्तरावरुन अर्थसहाय्य दिले जाते .प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण)अंतर्गत पात्र लाभार्थ्याना घर बांधण्यासाठी पंचायत समितीला डेमो हाऊस बांधण्यात आले आहे.यामागे पंचायत समिती प्रशासनाचा उद्देश आहे की पात्र लाभार्थ्यांनी चांगल्या प्रतीचे घर तयार करावे तेव्हा शासनाची पंतप्रधान आवास योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी डेमो हाऊस चे पाहणी करून डेमो एक आदर्श घरकुल निर्माण करावे असे आव्हान बीडीओ अंशुजा गराटे यांनी केले आहे.
कामठी पंचायत समिती मध्ये बांधले ‘डेमो हाऊस’
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com