संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28 :- सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासक श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या सभेत लेखापाल अमित खंडेलवाल, धर्मेश जैस्वाल यांनी सादर केलेल्या सन 2023-2024च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्प सादर करताना महसुल कर आणि भरपाई, महसुली अनुदाने, नगर परिषद मालमत्तेपासूम पासून उत्पन्न, फी आकार व दंड, वैशिष्ट्य प्रयोजनासाठी अनुदाने, आस्थापना व खर्च, प्रशासकीय खर्च , मालमत्तेची दुरुस्ती व परीक्षण, राखीव निधी, व संकीर्ण, खर्च, भांडवली खर्च, स्थिर व जंगम मालमत्ता व प्रगती पथावरील
भांडवली कामे ,प्रशासकीय इमारत बांधकाम, सौर ऊर्जा प्रकल्प,वाहतुक सिग्नल,सांडपाणी प्रकल्प,आस्थापना खर्च,दलित वस्ती,नागरी दलितोत्तर सुधार योजना,नगरोत्थान महाअभियांन याकरिता या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेल्या तरतुदी नुसार यावर्षी महसूल जमा हा 48 कोटी 82 लक्ष रुपये तर भांडवली जमा हा 1 कोटी 03 लक्ष 41 हजार रुपये आहे जमा महसुल मधून महसूल खर्च हा 47 कोटी 74 लक्ष रुपये तसेच एकुण भांडवली जमा मधून 89 कोटी 37 लक्ष रुपये खर्च होणार आहे यानुसार सन 2023-2024या आर्थीक वर्षाचे शिल्लकी अर्थसंकल्प अंदाजपत्रक अर्थसंकल्पला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून हा अर्थसंकल्प सादर करताना नगर परिषद चे लेखापाल अमित खंडेलवाल, वरिष्ठ लिपिक धर्मेश जैस्वाल तसेच महिला लिपिक आश्विनि पिल्लारे यांनी मोलाची कार्यालयिन कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.
बॉक्स:-एकूण भांडवल खर्च 85 कोटी 97 लक्ष राहणार असून यामध्ये प्रशासकीय इमारतीवर 15 कोटी ,सौर ऊर्जा प्रकल्पावर 1 कोटी ,वाहतूक सिग्नल वर दीड कोटी,तर सांडपाणी प्रकल्पावर 5 कोटी रुपये खर्च होणार आहेत तर महसुली खर्चातून 32 कोटी 61 लक्ष रुपयांचा आस्थापना खर्च होणार आहे ज्यामध्ये दलित वस्ती 7 कोटी,नागरी दलितोत्तर सुधार योजना 10 कोटी ,नगरोत्थान महाअभियान 8 कोटी रुपयेचा समावेश राहणार आहे.