कामठीतील थकबाकीदाराविरुध्द कामठी नगर परिषद ची कर वसुली मोहीम तेजीत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– आज एकाच दिवशी चार थकबाकी दाराचे दुकान केले सील 

कामठी :- कामठी नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून कामठी नगर परिषद ला प्राप्त विविध कर वसुलीतीन कामठी नगर परिषदचा कारभार सुरू करीत प्राप्त शासकीय निधीतून शहराच्या विकास करण्यात येतो तर स्थानिक मालमत्ता धारकाकडून मिळत असलेले’ कर ‘कामठी नगर परिषद च्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे.यासाठी नागरिकांनी कामठी नगर परिषद च्या विविध कराचा भरणा करून नागरिकांनी कामठी नगर परिषदला सहकार्य करावे असे नेहमी आवाहन करण्यात येते तरीसुद्धा बहुधा नागरिकांकडून कामठी नगर परिषद प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शहरातील विविध नागरिकावर कराची थकबाकी कायम आहे. या वर्षीचे आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असून नवीन आर्थिक वर्षे लागणार आहे तरीसुद्धा येथील स्थानिक मालमत्ताधारकावर तीन कोटीच्या आत कराची थकबाकी आहे.या कर वसुलीसाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून कामठी शहरातील मालमत्ता थकीत दाराविरुद्ध मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात थकीत कर वसुली पथक तयार केले असून थकीत कर आकारणी वसुलीला जोमात सुरुवात करण्यात आली असून दरम्यान आज कामठी शहरातील कामठी बस स्टँड चौक सह इतर ठिकाण च्या चार थकबाकीदार दुकांनदाराकडे थकीत कर वसुलीचा मोर्चा वळवून चार दुकानावर सीलबंद कारवाही केली.तर आज एकाच दिवसात राबविलेल्या कर वसुलीत 6 लक्ष रुपये वसुल करण्यात आले. इतर थकबाकीदारावर याप्रकारच्या सिलबंद कारवाहीचा बडगा न पडावा यासाठी थकीत मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर तसेच कर वसुली पथकातील कर अधीक्षक विजयकुमार आत्राम,कर निरीक्षक पल्लवी हुमने, स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां, प्रदीप भोकरे,,रुपेश जैस्वाल , दीपक जैस्वाल,रंजित माटे, कौशल्या शर्मा, अक्षीश मलिक,ऋषभ झंझोटे, संतोष मिश्रा, विजय मस्की,गणेश तलमले,अखिलेश मेंढे,अनुप वंजारी,राजेश कोडापे,शुभम टाकभवरे,शुभम बढेल,मनोज नारनवरे,अनमोल मेश्राम, अमन घोडेस्वार,सोनू भीमटे, सूरज पिल्लेवान,राकेश दमके, यांनी केले आहे.

– कर भरा नाही तर जप्तीची कारवाही सुरू

– कामठी नगर परिषद कर वसूली पथकाकडून कर वसुली पथक अधिक तीव्र केली असून कर वसुली पथक मैदानात उतरले आहेत कराचा भरणा करा नाही तर जप्तीची कारवाही होनार आहे.हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ग्रामीण भागातील पलायन थांबले पाहिजे,ग्रामीण भागातील विकासात्मक कामासाठी पहली वचन पुर्ती - आमदार चरणसिंग ठाकूर 

Sat Mar 29 , 2025
– श्री क्षेत्र मिनिवाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे विस्तारीकरण साठी २५लाखा चे भुमी पुजन – आमदार चरणसिंग ठाकूर यांचे वचन पुर्ती पर्वाला सुरूवात – आता!!काटोल विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबनार नाही कोंढाळी :- ग्रामीण भागातील पलायन थांबले पाहिजे, ग्रामीण भागातील पलायन थांबवायचे झाल्यास , शेतकरी सुखी संपन्न झाला पाहिजे. या करिता शेतकर्यांचे शेतीला पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!