संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सन 2025-2026 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासक संदीप बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत लेखाधिकारी चेतन तुरणकर , व वरिष्ठ लिपिक धर्मेश जैस्वाल यांनी सादर केलेल्या सन 2025-2026च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्प सादर करताना महसुल कर आणि भरपाई, महसुली अनुदाने, नगर परिषद मालमत्तेपासूम पासून उत्पन्न, फी आकार व दंड, वैशिष्ट्य प्रयोजनासाठी अनुदाने, आस्थापना व खर्च, प्रशासकीय खर्च , मालमत्तेची दुरुस्ती व परीक्षण, राखीव निधी, व संकीर्ण, खर्च, भांडवली खर्च, स्थिर व जंगम मालमत्ता व प्रगती पथावरील
भांडवली कामे ,प्रशासकीय इमारत बांधकाम, सौर ऊर्जा प्रकल्प,वाहतुक सिग्नल,सांडपाणी प्रकल्प,आस्थापना खर्च,दलित वस्ती,नागरी दलितोत्तर सुधार योजना,नगरोत्थान महाअभियांन याकरिता या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेल्या तरतुदी नुसार यावर्षी महसूल जमा हा 46 कोटी 97 लक्ष 10 हजार रुपये तर भांडवली जमा हा 1 अरब 49 कोटी 63 लक्ष रुपये आहे जमा महसुल मधून महसूल खर्च हा 49 कोटी 74 लक्ष 20 हजार रुपये तसेच एकुण भांडवली जमा मधून भांडवली खर्च 1 अरब 46 कोटी कोटी 57 लक्ष रुपये खर्च होणार आहे यानुसार सन 2025-2026या आर्थीक वर्षाचे शिल्लकी अर्थसंकल्प अंदाजपत्रक अर्थसंकल्पला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून हा अर्थसंकल्प सादर करताना नगर परिषद चे लेखाधिकारी चेतन तुरणकर अमि, वरिष्ठ लिपिक धर्मेश जैस्वाल यांनी मोलाची कार्यालयिन कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.