कामठी खापरखेडा मार्गावर मोटर सायकला मारुती व्हॅनची धडक ,एक ठार ,एक गंभीर व्हॅन चालकास अटक

कामठी – जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी- खापरखेडा मार्गावर  कामठी वरून खापरखेडा कडे जात असलेल्या मारोती व्हेन ने जबर धडक दिल्याने मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला तर  चालक तरुण गंभीर असल्याची घटना सकाळी 11 वाजता सुमारास घडली . जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत सुरेश हरोडे  वय 23 राहणार बिनाकी मंगळवारी नागपूर व त्याचा चुलत भाऊ पंकज यदुनाथ हारोडे वय 36 हे दोघेही मोटरसायकल क्रमांक एम एच 49 बी टी 4127 ने सुरादेवी कोराडी वरून खापरखेडा मार्गे कामठी कडे येत असतांना कामठी  खपरखेडा मार्गावरील सैनिक प्रशिक्षण केंद्रा जवळ भांडाऱ्या वरून वाकी येथे वाटर पार्कला पिकनिक  करिता जात असलेली मारुती व्हाण क्रमांक एम एच 34 बीएफ 1973 चा चालकाने निष्काळजीपणाने चालवून जबर धडक दिल्याने मोटारसायकल वर मागे बसलेला पंकज यदुनाथ हारोडे वय 36 हा घटनास्थळीच मरण पावला तर मोटारसायकल चालक भरत सुरेश खारोडे  वय 23 हा गंभीर असून त्याला कामठी नागपूर मार्गावरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जुनी कामठीचे  पोलीस उपनिरीक्षक नितीन मदनकर, हेडकॉन्स्टेबल अरविंद साखरे गोपाल टिके घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले अपघात होताच मारुती व्हेन मधील पाच तरुण पसार झालेला अपघात इतका जबर होता की दोन्ही गाड्याळाचा चुराडा झाला जुनी कामठी पोलीस स्टेशनला मारुती व्हॅन चालक विकास प्रकाश मानकर  वय 22 राहणार शास्त्री चौक भंडारा यांचे विरोधात  कलम 279 ,338, 304, (अ) भादवी नुसार गुन्हा दाखल करून  अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे महापौरांच्या हस्ते झाले भूमिपूजन

Sat Dec 11 , 2021
चंद्रपूर  : अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पार पडले. चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना निधीअंतर्गत १ कोटी ७० लख ५० हजार किमतीचे अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी महापौरांच्या हस्ते पार पडले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com