संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ठिकठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण
– पोलिसांचा कडकबंदोबस्त
कामठी :- भगवान श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाच्या पर्वावर काढण्यात आलेल्या शोभायात्रेने कामठी शहर दुमदुमले ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. गंज बालाजी मंदिराच्या प्रांगणातून सजविलेल्या रथावरील भगवान श्रीरामाच्या मूर्तीची समितीचे अध्यक्ष जयराज नायडू ,नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे हस्ते पूजा आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी रवी गोयल, रनाळ्याचे सरपंच पंकज साबळे, शिवसेनेचे शुभम नवले, प्रदीप सपाटे ,स्वप्निल फुकटे ,अभय खोपे ,आशिष वंजारी ,राजकिरण बर्वे ,अभिजीत चट्टी ,जीत गुजर ,गौरव लिंबाचिया, निलेश बरबटे, राजरोशन शिरसागर उपस्थित होते.
डीजे ,बँड ,ढोल ताशे ,फटाक्याच्या आतिश बाजीत निघालेली मिरवणूक कळमना टी पॉइंट ,सिंधी लाईन ,जय भीम चौक ,गावळीपुरा, जयस्तंभ चौक, गांधी चौक ,पोरवाल चौक ,फेरुमाल चौक, काटिवली चौक, लालाओळी चौक, बोरकर चौक ,कादर झेंडा ,राम मंदिर, मोदी पडावं,मच्छी पुल ,नेताजी चौक, मेन रोड, चावडी चौक ,जुनी ओळी, हैद्री चौक, मोटर स्टॅन्ड चौक ,जयस्तंभ चौक मार्गे नगर भ्रमण करीत गंज बालाजी मंदिरात शोभायात्रेचे समापन करण्यात आले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जुनी कामठी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे ,नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.