संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी कामठी शहराच्या संबंधित प्रभागामध्ये विभागून व अधीप्रमाणित करून तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने 30 जानेवारीला दिले आहेत त्यामुळे कामठी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
कामठी नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून तशी संबंधित प्रभागामध्ये विभागली जाणार आहे तर त्यामध्ये कोणतीही नावे वाढविणे ,कमी करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे यासारखी कोणतेही कामे करता येणार नाही. प्रभागनिहाय मतदार विभागताना प्रभागाच्या हद्दीवर राहणाऱ्या मतदारांच्या संदर्भात विशेष दक्षता घेण्यात येणार आहे तसेच गरज वाटल्यास स्थळ निरीक्षण करून मतदार यादी विभागली जाणार आहे तर एका प्रभागाच्या हद्दीतील मतदारांचे नावे अन्य प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत हे पाहणे आवश्यक असेल .कामठी नगर परिषद हद्दीतील मतदार वगळता येणार नाहीत तसेच क्षेत्राबाहेरील मतदार चुकीने समाविष्ट होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे .
मतदार यादी कार्यक्रमानुसार नेमून दिलेल्या दिनांकास प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने कामठी नगर परिषदला दिले आहेत .निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे कामठी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत.
– हरकती व सूचनांवर खालील बाबीवर निर्णय घेता येईल
-विधानसभा मतदार यादीत मतदारांचे नावे आहेत मात्र कामठी नगर परिषद च्या मतदार यादीच्या कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीत नावे समाविष्ट नसल्यास अशा मतदाराना मतदारापासून वंचित राहता न यावे यासाठी अशा मतदारांची नावे योग्य प्रभागात समाविष्ट केली जातील.
-विधानसभा मतदार यादीत मतदारांचे नाव नसतानाही नगर परिषद च्या प्रभागनिहाय मतदार यादीत नावे समाविष्ट असल्यास अशा मतदारांची नावे वगळण्यात येतील.मात्र नवीन मतदार या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करता येणार नाही हे इथं विशेष!