कन्हान :- आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलैकिक मेकअप आर्टिस्ट आणि समर्पित समाजसेविका प्रख्यात सेलि ब्रिटी मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे यांनी आपल्या यशस्वि कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. (दि.२४) डिसेंबर ला इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे कल्याण, महाराष्ट्र येथे त्यांना स्वर्ण भारत सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या सौंदर्य क्षेत्रातील व सामाजिक कार्यातील अद्वितीय योगदानाची पोचपावती आहे.
नागपुर जिल्हयातील कांद्री- कन्हान येथे जन्मलेल्या मेकअप आर्टिस्ट आणी समाजसेवा कल्याणी सरोदे हयांनी मेकअप क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केली असुन आपल्या कौशल्यामुळे त्या अनेक सेलिब्रिटींसोबत काम करत आहेत. तसेच त्यांना राष्ट्री य व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. सध्या त्यांच्या नावावर २५ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. ज्यामध्ये प्रतिष्ठित सोनु सूद आंतर राष्ट्रीय पुरस्कार देखिल आहे. कल्याणी ने आपल्या कला क्षेत्रा बरोबरच समाज सेवेतील उल्लेखनिय योग दानही दिले आहे. त्यांनी अनाथ आश्रम आणि वृद्धा श्रमांमध्ये असंख्य लोकांचे जीवन उजळवले आहे. त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे गरजु लोकांना फक्त मदतच मिळाली नाही, तर त्यांच्या जीवनात आत्मस न्मान आणि आशेची किरणेही दिलली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचे नाव इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंदवले गेले आहे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. हा सन्मा न त्यांच्या प्रगतीशील आणि परिश्रमातुन साकारलेले असल्याचे कल्याणी सरोदे हयांनी मनोगत व्यकत केले . नागपुर जिल्हयातील सर्व श्रेत्रातुन कल्याणी सरोदे चे कौतुक होत असुन अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.