कळमेश्वर :- पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाने वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कळमेश्वर येथे अप क्र. ६६०/२०२४ कलम ३१८(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दिनांक २६/०८/२०२४ रोजी दाखल असून यातील फिर्यादी नामे गं. भा. सरस्वती आत्माराम मुसळे, वय ७० वर्ष, रा. पोही, ता. कळमेश्वर या दिनांक २६/०८/२०२४ रोजी चे १२.४८ वा. चे सुमारास आपले राहते घरात हजर असता ०२ अनोळखी ईसम घरात येवून फिर्यादीस त्या एकटया राहत असल्याने त्यांना ७०,०००/- रु. चा चेक आला आहे असे सांगितले, व त्या चेक ने पैसे वटवण्या करिता १५,०००/- रू. या खर्च लागेल असे सांगुन फिर्यादी याना गळयातील सोन्याचे ४३ मनी ०२ डोल, ०१ डोरले असे एकून वजनी ०५ ग्रॅम किं १५ हजार रू. असे फिर्यादी यांचे कडून चेक चे पैसे काढण्या करिता खर्च लागतो सांगुन काढून दयायला लावले व फिर्यादीची फसवणूक केल्याचे तोंडी रिपोर्ट वरून नमुद गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघड करणे संदर्भात मा. अनिल मस्के सर, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग सावनेर यांनी तसेच पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे सा. यांनी आदेशित केल्याने तत्काळ पो.स्टे. कळमेश्वर, डी. बी. पथक रवाना होवून आरोपीचे वर्णनावरून घटनास्थळावर व काटोल नागपूर रोड परिसरात आरोपीचा शोध घेतला असता गोपनिय माहिती वरून नमुद गुन्हा हा तिवसा येथील राहणारा सराईत फसवणूकीचे गुन्हे करणारे गुन्हेगार रामराव भिमराव ढोबळे, व अमोल धानोरकर यांनी केला असल्याची माहीती मिळाले वरून तत्काळ रवाना होवून तिवसा जि. अमरावती येथुन आरोपी क्र. १) रामराव भिमराव ढोबळे, वय ५२ वर्ष, रा. अशोक नगर, तिवसा, जि. अमरावती याला ताब्यात घेवून त्याचे कडून गुन्हयात वापरलेली पेंशन कंपनीची मो.सा. किंमती अंदाजे ७०,०००/- रू. तसेच गुन्हयात पिवळ्या धातुचे ४४ मणी, ०१ डोरले, वजन अंदाजे ०२ ग्रॅम, किंमत अंदाजे १२,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून नमुद आरोपीला पोस्टे. ला आणून नमुद गुन्हयात आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाले पासून २४ तासाचे आत अटक करण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, अनिल महस्के सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे सा. यांचे नेतृत्वात केली असून यामध्ये त्यांना डी. वी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, स.फौ. सुनिल मिश्रा, पो. हवा. दयाराम करपाते, दिनेश गाडगे, पो.शि. मनिष सोनोने पो. स्टे कळमेश्वर यांनी मदत केली.