काळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरण दुर्देवी – ॲड. सुलेखाताई कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   

कामठी :- नाशिक येथील काळाराम मंदिर येथे आक्षेपार्ह पत्राच्या माध्यमातुन दलित समाजाच्या भावना दुखवण्याचे प्रयत्न करण्या-या आरोपिंना अटक करण्यात आले असले तरी अशा पध्दतीची घटना दुर्देवी असुन मी त्याचा निषेध करते. अश्या भावना माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केल्या.

या प्रकरणात सखोल चौकशी करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी व अशा घटनांची पुनरावृत्ति होवू नये याची दक्षता घ्यावी. असे निवेदन ॲड. सुलेखा कुंभारे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतील शिष्यवृत्ती योजनेसाठी परीक्षा

Sun Jun 23 , 2024
– दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यातील २ हजार ५२५ विद्यार्थ्यांचा सहभाग यवतमाळ :- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी नाव नोंदणी केलेल्या २ हजार ५२५ विद्यार्थ्यांची १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा उद्या रविवार, दि. २३ जून रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!