संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कबड्डी हा ग्रामीण युवकांना दिशा देणारा खेळ आहे त्यामुळे या खेळाकडे युवापिढीने वळले पाहिजे असे मौलिक प्रतिपादन माजी जी. प. सदस्य भाजप नेते अनिल निधान यांनी भोवरी गावात आयोजित कबड्डी स्पर्धा कार्यक्रमात बोलत होते.
मागील 66 वर्षांपासून भोवरी गावात आयोजित करण्यात येणाऱ्या कबड्डी स्पर्धा ची परंपरा कायम ठेवत यावर्षीसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यातील भोवरी गावात जय हनुमान व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरी च्या वतीने नुकतेच जय हनुमान व्यायाम शाळा भोवरी येथें भव्य कबड्डी स्पर्धा तसेच कुस्तीची आम दंगल आयोजित करण्यात आले होते.
या कबड्डी व आम दंगल कुस्ती चे उदघाटन आमदार टेकचंद सावरकर व माजी जी. प. सदस्य यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी उदघाटनपर भाषणात आमदार टेकचंद सावरकर यांनी कबड्डी या खेळाचे महत्व विशद करीत कबड्डी हा अस्सल भारतीय खेळ असून या खेळाला स्पर्धेमुळे मोठा प्लेफॉर्म मिळणार आहे. अनेक उदगोनमुख खेळाडूंना आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाल्याचे सांगून भोवरी गावात जय हनुमान सेवा व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरी च्या मागील 66 वर्षापासून आयोजित करण्यात येणारे कबड्डी स्पर्धेची परंपरा कायम असल्याचे कौतुक करण्यात आले.याप्रसंगी सरपंच ऋषी भेंडे, उपसरपंच, ग्रा प सदस्यगन, माजी सभापती रामकृष्ण वंजारी, भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले, पावंनगाव ग्रा प चे किरण राऊत यासह जय हनुमान व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरी चे समस्त पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय हनुमान व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरी च्या समस्त पदाधिकारी व सदस्यानी मोलाचे परिश्रम घेतले.