नागपूर :- १९ व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, स्त्री शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत, जलव्यवस्थापन महत्वाचे, विधवाश्रम, मुलींसाठी पहिली शाळा, अशा अनेक सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक युगपुरुष महात्मा जोतीराव फुले आहेत. शाळा स्थापन करुन, ते थांबले नाहीत तर अभ्यासक्रम, शिक्षणपध्दती यावर त्यांचा भर होता. दुष्ट परंपरा-रुढी नाकारुन मानवता प्रदान करणारे त्यांचे अखंड ही काळाची गरज आहे. शेतक-याचा आसूड, गुलामगीरी हे त्यांचे ग्रंथ बळीराजा आणि तत्कालीन विपरीत समाजव्यवस्थेचे विदारक चित्र स्पष्ट करतात. शिक्षण-ज्ञान-ग्रंथ-चिंतन-मनन-अध्ययन-वाणी-लेखणी-कृती असा प्रगतशील जीवन प्रवास आहे. सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांना शिक्षिकेचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कर्तेपण सिध्द केले. त्यांची शिकवण ही समस्त मानवांच्या कल्याणाची होती नव्हे ती विश्वव्यापी होती असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक, जेष्ठ संपादक, माजी अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग नागपूर द्वारे आयोजित जोती-सावित्री विचार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उत्तम कांबळे यांनी केले.
शेतीचा शोध स्त्रीने लावला समाजात रुजलेल्या एखादया चुकीच्या प्रथेविरोधी लढणे हे रेडयाविरोधी लढण्याएवढेच अवघड असते असेही उत्तम कांबळे यावेळी म्हणाले. जोती-सावित्री विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटक प्रसिध्द साहित्यिक रजिया सुलताना होत्या त्यांनी जोती-सावित्रीचे कार्य आजही कसे प्रासंगीक आहे याविषयी माहिती दिली. जोतीराव सावित्री यांचे सहजिवन हे जगातील सर्वोत्तम सहजिवनाचे उदाहरण होते, हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. आजही समाजात अनेक प्रकारचे लैंगीक, शारिरिक, सामाजिक प्रश्न आहेत केवळ बदनामीपायी त्यावर बोलल्या जात नाही चर्चाही होत नाही ही खंतही त्यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांनी, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार अशोकराव मानकर हे होत.
कार्यक्रमाचे प्रास्तरविक डॉ. अल्का झाडे यांनी केले, संचालन प्रा.पंकज कुरळकर तर आभार राजेंद्र पाटील यांनी केले. अखंड गायन जोती बनकर यांनी सादर केले. ज्योती सावित्री विचार साहित्य संमेल हे चार सत्रात पार पडले. दुसरे सत्र परिसंवाद या सत्राचे अध्यक्षा शैल जैमिनी, वक्ते डॉ. प्रवीण बनसोड, डॉ.भगवान फाळके, प्रा.डॉ. जयश्री सातोकर हे होते. या सत्राचे सुत्रसंचालन डॉ.पुष्पा तायडे तर आभार देवेंद्र काटे यांनी केले. सत्र तिसरे काव्य संमेलन या सत्राचे अध्यक्षा प्रा. विजया मारोतकर, प्रमुख अतिथी गोविंद गायकी, मिनल येवले हया होत्या. या सत्राचे सुत्रसंचान मंजुषा कऊटकर तर आभार डॉ.अभिजीत पोतले यांनी केले. सत्र चवथे या सत्राचे संमेलनाध्यक्ष उत्तमजी कांबळे, प्रा.संजय नाथे, डॉ.चंदु पाखरे, स्वागताध्यक्ष प्रा.अरुण पवार, या सत्राचे संचालन प्रा.पंकज कुरळकर तर आभार संस्थेचे सरचिटणीस रविंद्र अंबाडकर यांनी केले. आचार्य वि.स.जोग जेष्ठ समीक्षकांचा सत्कार प्रा. अरुण पवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सर्वश्री गुलाबराव चिचाटे, कार्याध्यक्ष प्रकाश देवते, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा.मुकेश घोळसे संचालक सर्वश्री सुनिल चिमोटे, अजय गाडगे, कृष्णा महादुरे, शरद चांदोरे, मोहित श्रीखंडे, प्रकाश बोबडे, नंदु कन्हेर, शोभा लेकुरवाळे, माधुरी गणोरकर व जोती-सावित्री विचारांचे कार्यकर्तागण आणि समाज बंधुभगीनी उपस्थित होते.