कामठी – राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषद २५ नोव्हेंबरला आभासी पद्धतीने संविधांनदिन साजरा करणार आहे.
मागील वर्षी संविधान दिनी प्रा हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.राज्यशास्त्र शिक्षक परिषद प्रत्येक वर्षी
राष्ट्रीय व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्य या वर्षी संविधान दिनी
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदे २५ नोव्हेंबर रोजी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुमिर पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिनाचे आयोजन केले आहे.याप्रसंगी नामवंत, सुप्रसिद्ध कायदे तज्ञ ऍड असीम सरोदे यांचे ऑन लाईन व्याख्यान साय ५ वाजता गुगल मिट व फेसबुक लाईव्ह वर आयोजित केले आहे.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन – प्रा हर्षदा दरेकर तर उद्देश पत्रिका वाचन प्रा.डॉ सुधीर अग्रवाल करतील
प्रस्तावित प्रा.संजय सुतार करतील.