बसपाने गोवारी शहिदांना अभिवादन केले 

नागपुर – 23 नोव्हेंबर 1994 ला (28 वर्षापूर्वी) गोंड गोवारी या जमातीमध्ये एक कॉमा टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या गोवारी समाजाच्या मोर्चाने शरद पवार सरकार मध्ये 114  जीव गमावले. परंतु 28 वर्षांनंतरही भाजप-सेना व कॉंग्रेस-राकाच्या सरकारने त्यांना न्याय दिला नाही. त्या अन्यायकारी व संविधान विरोधी सरकारच्या निषेधार्थ व शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज बसपाने शहीद गोवारी स्मारकास अभिवादन करुन या दोन्ही सरकारचा निषेध करुन त्यांना धडा शिकविण्याचे आवाहन यावेळी बसपा नेत्यांनी केले.
बसपा च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, बसपाचे ज्येष्ठ नेते उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे व मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभिवादन करण्यात आले.
1994 पूर्वी गोंड व गोवारी यांना  स्वतंत्ररीत्या आदिवासींच्या सवलती मिळत होत्या. परंतु प्रशासकीय चुकीने त्यांच्या मधील कामा काढण्यात आल्याने गोवारी समाजाला आरक्षण वंचित करण्यात आले. हा कॉमा टाकण्यासाठी गोवारी समाजाने भाजप-सेना व कॉंग्रेस-राका सरकार च्या विरोधात दरवर्षी आंदोलने केली. परंतु त्यांना यात यश आले नाही. उलट राज्य शासनाने त्यांना एसबीसी म्हणजेच विशेष मागास वर्गाचा दर्जा देऊन थातुरमातुर व्यवस्था केली.
“आज बसपाने ये सरकार वो सरकार दलित-आदिवासी विरोधी सरकार, तख्त बदल दो ताज बदल दो बेईमान सरकार का राज बदल दो,  जो बहुजन की बात करेगा वह दिल्ली से राज करेगा, दलित-आदिवासी जागेगा चोर लुटेरा सत्ताधारी भागेगा, आरक्षण कोही भीख नही संविधानिक अधिकार है,  संविधान के सन्मान में बीएसपी मैदान में, आदिवासी भाईयो के सन्मान में बीएसपी मैदान में, शहीद गोवारी अमर रहे,” आदि गगनभेदी घोषणा देऊन  गोवारी समाजातील शहीद बांधवांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर जिल्हा प्रभारी विजयकुमार डहाट, जिल्हा सचिव मनोज निकाळजे, पश्चिम नागपूर चे अध्यक्ष मनोज गजभिये, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष ओपुल तामगाडगे, माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, माजी जिल्हा महासचिव अमित बागेश्वर, प्रा सुनील कोचे, प्रकाश फुले, नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, सचिव विलास मुन, बुद्धम् राऊत, वीरेंद्र कापसे, परेश जामगडे, मॅक्स बोधी, सुरेंद्र डोंगरे, विनोद मोहोड, सुनील बारमाटे, सुमित जांभूळकर, संभाजी लोखंडे, विकास नारायण, भानुदास ढोरे आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Aditya Bioinnovation wins “Best innovative agri startup “at Agri-Food Empowering India Awards 2021

Tue Nov 23 , 2021
Chandrapur – Aditya Bioinnovation was awarded the ‘Best innovative agri start-up” at Agri-Food Empowering India Awards2021 on 12 th November 2021 for its research in herbal based plant protector and bio- stimulants in nano form which reduces the dependency of chemical fertilizers and pesticides.The award recognises excellence and innovative concepts in production of eco-friendly , human friendly herbal based plant […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com