संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारेगाव बाह्य वळण मार्गे अशोल ले लँड कंपनीची इकोमेट वाहन क्र एम एच 28 बी बी 4747 ने अवैधरित्या 33 गोवंशीय जनावरे कोंबून दोरीने बांधून क्रूरतेने वाहून नेत असलेल्या वाहनावर जुनी कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेत असलेल्या 33 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज 2मार्च ला सकाळी 6 दरम्यान केली तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेले ट्रक मधील 33 गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले. तर या कारवाहितुन 14 लक्ष 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यातील आरोपी ट्रकचालक कुणाल भोयर वय 29 वर्षे रा. जुनी खलाशी लाईन कामठी विरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आले तसेच पसार आरोपी ट्रक मालक व माल मालका विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला तर या कारवाहितुन जप्त 33 गोवंश जनावरे किमती 3 लक्ष 96 हजार रुपये तसेच जप्त ट्रक किमती 11 लक्ष रुपये असा एकूण 14 लक्ष 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नलवाडे यांच्या मार्गदर्शनार्थ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने,डी बी स्कॉड चे धर्मेंद्र राऊत व सहकारी पोलिसांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.