संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- खांनपाणाच्या तुलनेत हिवाळा हा जेवणासाठी उपयुक्त ऋतू मानला जातो .या हिवाळ्याच्या ऋतूत शरीराच्या दृष्टीने ज्वारी व बाजरीची भाकर तसेच वांग्याच्या भरता च्या भाजीला नागरिकांनी जास्तच पसंती दिली आहे.त्यामुळे कामठी तालुक्यातील धान्य बाजारात ज्वारी व बाजरी खरेदीची मागणी वाढली आहे तसेच भाजो बाजारात मोठ्या वांग्याच्या खरेदीची मागणी वाढली आहे.
ज्वारीच्या तुलनेत बाजरीचे दर कमी आहे मात्र थंडी मुळे बाजारात बाजरीची विक्री जास्त होत असून बाजरीचे उत्पादन प्रामुख्याने राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या काही भागात होत असते .सध्या हिवाळ्यात ज्वारी व बाजरीला नागरिकांनी जास्तच पसंती दिली असून या बाजरी सह मोठ्या वांग्याच्या भरताची भाजी सोबतीला जेवण करून जेवणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतात. बाजरीचे शरीराला अनेक फायदे आहेत तर ज्वारीत पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे महत्वाचे घटक असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच बाजरीत गव्हाच्या चपातीपेक्षा कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन वाढत नाही.बाजरी उष्ण असते त्यामुळे थंडीत शरीराच्या आत ऊर्जा निर्माण करते .थंडीत आवर्जून आहारात समावेश करावा असा पदार्थ बाजरी व ज्वारीची भाकर असल्याने विशेषता या थंडीच्या ऋतूत नागरिक बाजरी व ज्वारीची भाकर सह वांग्याच्या भरताची भाजीला अधिकच पसंती देत आहेत.
– बाजरी महिलांसाठी पौष्टिक-बाजरी खाल्ल्याने स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते तर प्रसूती व बाळंतपणात पौष्टिक दूध तयार होण्यास उपयुक्त ठरते त्याचबरोबर बाजरीची भाकरी नियमित खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते व झोप शांत लागते तसेच हिवाळ्यात आपण उष्म पदार्थ शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास खातो, हिवाळ्यात ज्वारी वा बाजरीची भाकर व वांग्याची भाजो असा आहार घेतल्यास जेवणास पर्याप्त आहार होतो.बाजरी प्रकृतीने उष्ण , पचायला हलकी व चवीला रुचकर व पौष्टिक असते यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थाचे योग्य प्रमाण असते त्यामुळे बाजरीच्या भाकरीचे जेवणाचे समाधान मिळते, लवकर भूक लागत नाही .वजन नोयांत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असते .बाजरीची भाकरी उर्जादायी असते व यात फॉलिक ऍसिड व सत्व, कॅल्शियम, लोह, पोट्याशियम, मॅग्नेशियम सारखी अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असल्याचे वयोवृद्ध जुने जाणकार लोकांचे मत आहे.