-वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक –पोलिस निरिक्षक प्रमोद मकेश्र्वर
रामटेक :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून रामटेक पोलिस प्रशासन तर्फे, पोलिस स्टेशन रामटेक येथे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र चव्हाण पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्र्वर , पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राउत , सहाय्यक पोलीस निरीक्षक येवले, व पत्रकार उपस्थित होते.
पोलिस आणि पत्रकार यांचे संबंध नेहमी येतात ,दोघांनीही आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर निश्चितच समाजाला त्याचा फायदा होईल , पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे त्यांनी याची जाणीव ठेऊन कार्य केले पाहिजे याचा फायदा पोलिस दल व समाजाला देखील होईल असे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले….

पत्रकारांचा मानसन्मान व्हावा या करिता ही बैठक घेण्यात आली होती , तसेच कोव्हिड सुरू असल्यामुळे सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नका ,असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी केले आहे…