पत्रकार दिलीप मेश्राम यांना समाज रत्न पुरस्काराने सम्माणीत

-सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांचे हस्ते दिला पुरस्कार
कामठी ता प्र 30:-टिळक पत्रकार भवन सीताबर्डी नागपूर येथे 27 मार्च ला भोई गौरव मासिकाद्वारे आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायाधीश व मागासवर्गीय आयोग सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचे हस्ते व यवतमाळ च्या उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे,प्रख्यात साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर,जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके,प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण ढाले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.वर्षा गंगणे- नवदेवे ,कला वाणिज्य महाविद्यालय देवरी चे एम.बी.पटेले,अमरावतीचे वासुदेव सुरजूसे,भंडाराचे सदाशिव वलथरे, मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे,भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष एड.दादासाहेब वलथरे, भाजपा राज्यपरिषद सदस्य प्रकाशभाऊ वांढे यांचे प्रमुख उपस्थितीत
पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याची दखल व समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी व समाजातील विविध समस्यांवर आपल्या लेखणीतून उत्कृष्ट कार्य व धडपड तसेच नेहमीच प्रयत्नशील असणारे पत्रकार दिलीप मेश्राम यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र,शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दिलीप मेश्राम यांनी भोई गौरव मासिकेचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांची स्तुती करत या मासिकेने खरोखरच समाज जागृतीचे काम मागील तीन वर्षांपासून करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले. व माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
तर पत्रकार दिलीप मेश्राम यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप कांबळे, पत्रकार प्रा सुदाम राखडे, उज्वल रायबोले, सुनील चलपे, नंदू कोल्हे, नितु दुबे,नितीन रावेकर, निलेश रावेकर, वाजीद अली, यासह पारशिवनी पत्रकार संघाचे देवानंद शेंडे आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्णांसाठी अभिरुख मुलाखत प्रशिक्षण

Thu Mar 31 , 2022
नागपूर, दि. 30: संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2021-22 चा निकाल दि. 17 मार्च 2022 रोजी घोषित झालेला आहे. मुख्य परीक्षेत उर्त्तीण होवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने अभिरुख मुलाखत प्रशिक्षण-2022 कार्यक्रमाचे राज्य शासनाद्वारे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांसाठी दिल्ली येथे जुने महाराष्ट्र सदन, कोपरनिकस मार्ग, मंडी हाऊस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com