नागपूर :- दि नागपूर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तालुका नागपूर व दृष्टी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती दिन कार्यक्रम तसेच संक्रांतीनिमित्त तिळगुळ कार्यक्रम एनआयटी गार्डन रेवती नगर बेसा येथे आयोजित करण्यात आला होता. दि नागपूर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष संगीता अरुण चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी बचत गटांची आधारवड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संध्या राजुरकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीला अनिल देशमुख यांनी केले. सावित्री आई व जिजाऊंच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकला. दि नागपूर क्रेडिट को-ऑपरेटिव्हच्या अध्यक्षा संगीता चव्हाण यांचे अशा प्रकारचा समाज प्रबोधन पर कार्यक्रम राबविण्याचा हे तिसरे वर्ष आहे . त्या वैचारिक वाण म्हणून पुस्तक देतात. आतापर्यंत त्यांनी हजारो रुपयांचे पुस्तक वाण म्हणून दिलेत हा आगळावेगळा प्रयोग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा डोंगरे त्याचप्रमाणे विभा मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना चंदनखेडे यांनी केले.
दि नागपूर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तालुका नागपूर व दृष्टी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती दिन कार्यक्रम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com